Join us  

पाकिस्तानच्या खेळाडूंना संघातून बाहेर काढल्याच्या वक्तव्यावरून बीसीसीआयवर भडकली पीसीबी

जर या संघात पाकिस्तानचा खेळाडू असेल तर भारताचा एकही खेळाडू या सामन्यात खेळणार नाही, अशी कठोर भूमिका बीसीसीआयने घेतली होती.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2019 2:06 PM

Open in App

मुंबई : जर पाकिस्तानचे खेळाडू संघात असतील तर भारताचा एकही खेळाडू सामना खेळणार नाही, अशी भूमिका बीसीसीआयने काल घेतली होती. या बीसीसीआयच्या भूमिकेवर पीसीबी चांगलीच भडकलेला पाहायला मिळत आहे.

यावेळी एशिया इलेवन हा संघ निवडण्यात येणार आहे. यामध्ये आशियातील सर्वोत्तम संघांची निवड करण्यात येणार आहे. पण या आशियातील संघात पाकिस्तानचा एकही खेळाडू नसावा, अशी अट बीसीसीआयने ठेवली आहे. जर या संघात पाकिस्तानचा खेळाडू असेल तर भारताचा एकही खेळाडू या सामन्यात खेळणार नाही, अशी कठोर भूमिका बीसीसीआयने घेतली होती.

याबाबत पीसीबी म्हणाली की, " बीसीसीआयने ठेवलेली ही अट चुकीची आहे. कारण आमच्या खेळाडूंबाबत बीसीसीआयने अशी भूमिका घेऊ नये. या सर्व गोष्टींमुळे बीसीसीआयची प्रतिमा वाईट होत आहे. जर सामन्यांची तारीख बदलली तर पाकिस्तानचे खेळाडू या सामन्यांमध्ये नक्कीच खेळतील." 

पाकिस्तानबरोबर आम्ही द्विदेशीय सामना खेळणार नाही, हे बीसीसीआयने यापूर्वीच स्पष्ट केले आहे. त्याचबरोबर पाकिस्तानमध्येही खेळायला जाणार नाही, हेदेखील ठणकावून सांगितले आहे. त्यामुळे कोणतीही मोठी स्पर्धा पाकिस्तानमध्ये घ्यायला आयसीसी धजावत नाही. आता तर बांगलादेशमध्येही पाकिस्तानबरोबर खेळणार नाही, असा निर्णय बीसीसीआयने घेतला आहे.

यावेळी एशिया इलेवन हा संघ निवडण्यात येणार आहे. यामध्ये आशियातील सर्वोत्तम संघांची निवड करण्यात येणार आहे. पण या आशियातील संघात पाकिस्तानचा एकही खेळाडू नसावा, अशी अट बीसीसीआयने ठेवली आहे. जर या संघात पाकिस्तानचा खेळाडू असेल तर भारताचा एकही खेळाडू या सामन्यात खेळणार नाही, अशी कठोर भूमिका बीसीसीआयने घेतली आहे.

टॅग्स :बीसीसीआयभारतपाकिस्तानबांगलादेश