Join us

PBKS vs LSG, IPL 2023 Live: काइल मायर्सची 'पावर'; आयपीएलमध्ये नोंदवला विक्रम, 20 चेंडूत कुटल्या 50 धावा

लखनौची अतिशय वेगवान सुरुवात, काइल मायर्सचे चौथे अर्धशतक.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2023 20:39 IST

Open in App

PBKS vs LSG, IPL 2023 Live: आज पंजाब किंग्ज आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात पंजाबच्या मोहालीमध्ये होते आहे. पंजाबने टॉस जिंकून गोलंदीजाचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना लखनौची जबरदस्त सुरुवात झाली आहे. संघाने अवघ्या 10 षटकात 100 चा आकडा पार केला आहे. पॉवरप्लेमध्येच 74 धावा झाल्या. तसेच, सलामीला आलेल्या काईल मायर्सने अतिशय स्फोटक फलंदाजी केली. 

कर्णधार केएल राहुल आणि काइल मायर्सने लखनौला चांगली सुरुवात करुन दिली. पण, लखनौला केएल राहुलच्या रुपात पहिला झटका बसला. राहुल अतिशय स्वस्तात आउट झाला. पण, मायर्सने दुसरी बाजू चांगली सांभाळली. मायर्स 54 धावा करून बाद झाला. त्याला कागिसो रबाडाने शिखर धवनच्या हाती झेलबाद केले. 

केएल राहुलची विकेट गमावल्यानंतर लखनौने पॉवरप्लेमध्ये संघाने 74 धावा केल्या. कर्णधार 12 धावा करून बाद झाला. यानंतर काइल मायर्स आणि आयुष बडोनी यांनी अर्धशतकी भागीदारी केली. काइल मायर्सने मोसमातील चौथे अर्धशतक 20 चेंडूत पूर्ण केले. पॉवरप्लेमध्येच मोठे फटके मारत त्याने आपले अर्धशतक पूर्ण केले. मायर्सचे चालू मोसमातील हे चौथे अर्धशतक आहे. त्याने 225.00 च्या स्ट्राइक रेटने 24 चेंडूत 54 धावा कुटल्या. मायर्सच्या खेळीत 7 चौकार आणि 4 षटकारांचा समावेश होता.

टॅग्स :लखनौ सुपर जायंट्सपंजाब किंग्सआयपीएल २०२३
Open in App