PBKS vs GT IPL 2026 Who is Ashok Sharma Debut For Gujarat Titans : आयपीएलच्या २०२६ च्या हंगामात आणखी एका अनकॅप्ड भारतीय खेळाडूला पदार्पणाची संधी मिळाली आहे. गुजरात टायटन्सचा कर्णधार शुभमन गिल याने पंजाब किंग्स विरुद्धच्या सामन्यात राजस्थानचा वेगवान गोलंदाज अशोक शर्मा याला पदार्पणाची कॅप दिली. न्यू चंदीगड येथील मुल्लानपूर येथील महाराजा यादविंद्रसिंग पीसीए स्टेडियमवर पंजाबचा कर्णधार श्रेयस अय्यर याने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. इथं जाणून घेऊयात कोण आहे २३ वर्षीय भारतीय जलदगती गोलंदाज? आणि देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्याने खास कामगिरीसह कशी सोडली आहे छाप त्यासंदर्भातील सविस्तर माहिती
सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेत विक्रमी कामगिरी
IPL 2026 च्या लिलावात गुजरात टायटन्सच्या संघाने राजस्थानच्या अशोक शर्मा या युवा गोलंदाजासाठी ९० लाख रुपये मोजले होते. उजव्या हाताने मध्यम जलदगती गोलंदाजी करणाऱ्या २३ वर्षीय गोलंदाजाने देशांतर्गत क्रिकेटमध्ये आपल्या गोलंदाजीची धार दाखवली होती. २०२५-२६ च्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी टी-२० स्पर्धेतील कामगिरीमुळे हा चेहरा चर्चेत आला होता. या स्पर्धेत त्याने १० सामन्यांत २२ विकेट्स घेत, एका हंगामात सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम नोंदवला होता.
१५० kmphs वेगाने गोलंदाजी करण्याची क्षमता
गुजरात टायटन्सकडून पदार्पण करणारा अशोक शर्मा याआधी कोलकाता नाइट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्ससाठी नेट गोलंदाजाच्या रुपात दिसला आहे. तो सातत्याने १५० kmphs वेगाने गोलंदाजी करण्याची क्षमता असणारा गोलंदाज आहे. हार्ड लेंथ गोलंदाज पदार्पणात आपल्या भेदक माऱ्याचा नजराणा पेश करून IPL मध्ये छाप सोडण्यासाठी प्रयत्नशील असेल.
नेहराचा नवा 'मोहरा' मैदान गाजवण्यास सज्ज
गुजरात टायटन्स संघाची बांधणी करण्यात संघाचा मुख्य कोच आणि भारताचा माजी जलदगती गोलंदाज आशिष नेहराची भूमिका महत्त्वपूर्ण असते. मिनी लिलावात भारताच्या उद्यात्मुख स्टारवर त्याने लावलेला डाव हा मास्टर स्ट्रोक मानला गेला. देशांतर्गत स्पर्धा गाजवल्यानंतर नेहरानं या पठ्ठ्याला आपल्या तालमीत तयार केले आहे. पदार्पणाची संधी मिळाल्यावर तो कशी कामगिरी करतो ते पाहण्याजोगे असेल.
Web Summary : Uncapped Ashok Sharma debuted for Gujarat Titans against Punjab Kings in IPL 2026. Picked for ₹90 lakh, Sharma impressed with 22 wickets in the Syed Mushtaq Ali Trophy. He previously served as a net bowler for KKR and RR and bowls consistently at 150 kmphs.
Web Summary : अनकैप्ड अशोक शर्मा ने आईपीएल 2026 में पंजाब किंग्स के खिलाफ गुजरात टाइटन्स के लिए पदार्पण किया। 90 लाख रुपये में चुने गए शर्मा ने सैयद मुश्ताक अली ट्रॉफी में 22 विकेट लेकर प्रभावित किया। इससे पहले केकेआर और आरआर के लिए नेट गेंदबाज के रूप में काम किया और लगातार 150 किमी प्रति घंटे की रफ्तार से गेंदबाजी करते हैं।