Join us

PBKS vs DC : स्टॉयनिसची वादळी खेळी; २७५ च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या धावा

मार्कस स्टॉयनिसनं सुरुवातीपासूनच आक्रमक अंदाजात फलंदाजी केली.

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2025 23:24 IST

Open in App

जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर रंगलेल्या सामन्यात मार्कस स्टोयनिसने आपल्या तुफान फटकेबाजीनं मैफिल लुटली. त्याच्या धमाकेदार खेळीच्या जोरावरच पंजाब किंग्जच्या संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना निर्धारित २० षटकांत ८ बाद २०६ धावा करत दिल्ली कॅपिटल्ससमोर तगडे आव्हान उभारले.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

स्टॉयनिसची तुफान फटकेबाजी

१६ व्या षटकात पंजाब किंग्जनं धावफलकावर ५ बाद १४४ धावा लावल्या होत्या. ऑस्ट्रेलियन अनुभवी अष्टपैलू खेळाडू मैदानात आला अन् त्याने आपल्या तुफान फटकेबाजीसह दिल्लीच्या ताफ्यातील गोलंदाजांचा खरपूस समाचार घेतला. मार्कस स्टॉयनिस याने १६ चेंडूत ३ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने २७५ च्या स्ट्राइक रेटनं नाबाद ४४ धावांची खेळी केली.

जिथं संधी मिळते तिथं तो 'बेस्ट'च देतो! टेस्टमधून डावललेल्या श्रेयस अय्यरनं पुन्हा दाखवली आपली ताकद

मुकेश अन् मोहितला धु धु धुतलं

मार्कस स्टॉयनिसनं सुरुवातीपासूनच आक्रमक अंदाजात फलंदाजी केली. दिल्लीच्या ताफ्यातील मुकेश कुमार आणि मोहित शर्मा या दोघांची त्याने चांगलीच धुलाई केली. १७ व्या षटकात त्याने मुकेश कुमारच्या गोलंदाजीवर हल्लाबोल केला. या षटकात अय्यर-स्टॉयनिस जोडीनं २५ धावा कुटल्या. यात अय्यरचा एक चौकार सोडला तर स्टॉयनिसनं मारलेल्या २ षटकारांसह एका चौकाराचा समावेश होता. मुकेश कुमारनं या षटकात वाइडच्या रुपात ३ अवांतर धावा दिल्या. १९ व्या षटकात स्टोयनिसने मोहित शर्माची धुलाई केली. या षटकात त्याने २ षटकार २ चौकार मारले. दिल्लीकरांच्या या दोन षटकात पंजाबच्या बॅटर्संनी ४७ धावा काढल्या. कोरानातून सावरून परतलाय स्टॉयनिस

भारत-पाक यांच्यातील तणावपूर्ण परिस्थितीमुळे आयपीएल स्पर्धा आठवड्याभरासाठी स्थगित करण्यात आली होती. या ब्रेकमध्ये स्टॉयनिस हा मायदेशी परतला होता. तिथं गेल्यावर त्याला कोरानाची लागण झाली. यातून सावरून तो पुन्हा पंजाबच्या ताफ्यात परतला आहे. प्लेऑफ्सआधी त्याच्या भात्यातून पाहायला मिळाले फटकेबाजी पंजाब किंग्जसाठी मोठा दिलासाच आहे.

टॅग्स :इंडियन प्रिमियर लीग २०२५पंजाब किंग्सदिल्ली कॅपिटल्सइंडियन प्रीमिअर लीग