भारत-पाक यांच्यातील तणावामुळे स्थगित करण्यात आलेली आयपीएल स्पर्धा पुन्हा एकदा सुरु होत आहे. उर्वरित सामने मर्यादित ठिकाणी नियोजित असून वेगवेगळ्या फ्रँचायझी संघातील खेळाडू आपल्या शेड्यूलनुसार, संघाला जॉईन होत आहे. प्रीती झिंटाच्या सह मालकीच्या पंजाब किंग्ज संघातील स्टार खेळाडू शशांक सिंह हा देखील १८ मे रोजी राजस्थान रॉयल्स विरुद्ध रंगणाऱ्या सामन्यासाठी राजस्थानला पोहचला आहे. पण त्याचे लगेज मात्र बंगळुरुला पोहचले आहे. घडलेल्या या प्रकारामुळे प्रीतीचा मोहरा चांगलाच भडकला असून त्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून एक पोस्ट शेअर करत इंडिगो विमान सेवेच्या भोंगळ कारभार चव्हाट्यावर आणलाय.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
सोशल मीडियावरुन शेअर केला विमान प्रवासातील असुविधेचा किस्सा
शशांक सिंह याने इन्स्टाग्राम स्टोरीच्या माध्यमातून विमान प्रवासातील असुविधेची स्टोरी शेअर केलीये. इंडिगो कंपनी आणि कर्मचाऱ्यांवर राग काढताना त्याने पोस्टमध्ये लिहिलंय की, @indigo.6e! ही आपल्या देशातील सर्वात खराब विमान सेवा देणारी कंपनी आहे. माझं लगेज हे जयपूरला पोहचायला हवं होते. पण ते आता बंगळुरुमध्ये आहे. ते एवढ्या चलाकीनं काम कसे करता याचे आश्चर्य वाटते, अशा शब्दांत त्याने असविधेबद्दल आपली नाराजी व्यक्त केलीये.
IPL 2025 : गिलच्या संघातून बटलर होणार 'गायब'! पाकला ठेंगा दाखवत हा खेळाडू घेणार त्याची जागा
कर्मचारी सेवा देण्यापेक्षा अहंकार बाळगण्यात नंबर वन
इंडिगो कंपनीच्या विमानातून प्रवासात करताना आलेल्या अनुभवाबद्दल त्याने पुढे म्हटलंय की, संबंधित प्रकारानंतर इंडिगोच्या कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. ते अहंकाराच्या बाबतीत सर्वात अव्वल आहेत. जयपूर इंडिगोतील कर्मचारी संपर्क कक्षेच्या बाहेर गेले आहेत. त्यांनी ना माझा कॉल रिसिव्ह केला ना माझ्या लगेजसंदर्भातील काही माहिती देण्याची तसदी घेतली, असे म्हणत त्याने इंडिगोच्या कर्मचाऱ्यांना जाहिररित्या सुनावले आहे.