IPL 2026 : आता ईशान किशन कॅप्टन्सीच्या शर्यतीत; अभिषेक शर्मालाही मिळू शकते मोठी जबाबदारी

ईशान किशनची कर्णधारपदासाठी दावेदारी; पॅट कमिन्सच्या जागी मिळणार संधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2026 11:19 IST2026-03-17T11:03:29+5:302026-03-17T11:19:57+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
Pat Cummins To Miss Initial Matches Of IPL 2026 Due To Injury Ishan Kishan Set To Name Captain Of SRH | IPL 2026 : आता ईशान किशन कॅप्टन्सीच्या शर्यतीत; अभिषेक शर्मालाही मिळू शकते मोठी जबाबदारी

IPL 2026 : आता ईशान किशन कॅप्टन्सीच्या शर्यतीत; अभिषेक शर्मालाही मिळू शकते मोठी जबाबदारी

सनरायझर्स हैदराबादचा नियमित कर्णधार पॅट कमिन्स अजूनही पाठीच्या दुखापतीतून पूर्णपणे सावरलेला नाही. तो आयपीएलच्या (Indian Premier League 2026) यंदाच्या हंगामात नेमका कधी संघात सामील होणार, याबाबत अनिश्चितता कायम आहे.  कमिन्सच्या अनुपस्थितीत भारतीय स्टार ईशान किशन (Ishan Kishan) सनरायझर्स हैदराबादची (Sunrisers Hyderabad) धुरा सांभाळताना दिसू शकतो.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, आगामी आयपीएल हंगामात सनरायझर्स हैदराबाद संघ कर्णधारपदाची जबाबदारी ईशान किशनकडे सोपवू शकतो, याशिवाय अभिषेक शर्माकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी दिली जाऊ शकते. सनरायझर्स हैदराबादचा संघ आयपीएलच्या यंदाच्या हंगामात गत चॅम्पियन RCB विरुद्ध सलामीचा सामना खेळणार आहे. हा सामना बंगळुरुच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे. २८ मार्चच्या सलामीच्या लढती ईशान किशन संघाची कॅप्टन्सी करताना दिसू शकतो.

 "पाकिस्तानी खेळाडूला पैसा देत असेल तर ती.." गावसकरांनी IPL चा दाखला देत काव्या मारनला सुनावलं

ईशान किशनची कर्णधारपदासाठी दावेदारी

ईशान किशन याच्याकडे कॅप्टन्सीचा अनुभव आहे. देशांतर्घत क्रिकेटमधील सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेत त्याने झारखंडचे नेतृत्व करताना संघाला जेतेपद मिळवून दिले होते. त्याने भारतीय अंडर १९ संघाचेही नेतृत्व केले आहे. त्यामुळे पॅट कमिन्सच्या अनुपस्थितीत सनरायझर्सचा संघ ईशान किशनकडे नेतृत्वाची जबाबदारी देऊ शकतो.

आयपीएलमधील ईशान किशनची कामगिरी

ईशान किशनने आयपीएलमध्ये आतापर्यंत तीन फ्रँचायझींचे प्रतिनिधित्व केले आहे. ११९ सामन्यांत त्याने २९.१० च्या सरासरीसह १३७.६४ च्या स्ट्राइक रेटने २९९८ धावा केल्या आहेत. यात १ शतक आणि १७ अर्धशतकांचा समावेश आहे. विकेटकीपिंग करताना त्याने ५९ झेल आणि ५ स्टंपिंग केल्या आहेत.

२०२५  च्या लिलावात सनरायझर्स हैदराबादने त्याला ११.२५ कोटी रुपयांना खरेदी केले होते  त्या हंगामात त्याने १४ सामन्यांत १५२.५८ च्या स्ट्राइक रेटने ३५४  धावा करत एक शतक आणि एक अर्धशतक झळकावले. त्याच्या आक्रमक फलंदाजीमुळे संघातील त्याची उपयुक्तता पुन्हा सिद्ध झाली. ईशान किशनसह अभिषेक शर्मानं टी-२० वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये धमाकेदार शो दाखवला होता. आता ही जोडी SRH च्या संघाला २०१६ नंतर पुन्हा एकदा ट्रॉफी जिंकून  देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार का? ते पाहण्याजोगे असेल.

Web Title : आईपीएल 2026: ईशान किशन कप्तानी की दौड़ में; अभिषेक शर्मा को मिल सकती है जिम्मेदारी

Web Summary : पैट कमिंस की अनिश्चितता के बीच, ईशान किशन सनराइजर्स हैदराबाद की कप्तानी कर सकते हैं। अभिषेक शर्मा उप-कप्तान हो सकते हैं। किशन का नेतृत्व अनुभव और शर्मा का टी20 फॉर्म एसआरएच की सफलता के लिए महत्वपूर्ण हैं।

Web Title : IPL 2026: Ishan Kishan in captaincy race; Abhishek Sharma may get responsibility.

Web Summary : With Pat Cummins's availability uncertain, Ishan Kishan might captain Sunrisers Hyderabad. Abhishek Sharma could be vice-captain. Kishan's leadership experience and Sharma's T20 form make them key for SRH's success.