Join us

IPL 2021: कमिन्स आयपीएलमध्ये खेळणार नाही; अन्य ऑस्ट्रेलियन खेळाडूंबाबत सीए निर्णय घेणार

भारतीय क्रिकेट बोर्डाने यूएईत सप्टेंबरमध्ये आयपीएलला पुन्हा सुरुवात करण्यास मंजुरी प्रदान केली. आयपीएलच्या १४ व्या पर्वातील ३१ सामने शिल्लक आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2021 09:11 IST

Open in App

सिडनी : कोलकाता नाइट रायडर्सचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स इंडियन प्रीमिअर लीगच्या (आयपीएल) संयुक्त अरब अमिरातमध्ये (यूएई) आयोजित टप्प्यात खेळणार नाही. अन्य ऑस्ट्रेलियन खेळाडूंना यात सहभागी होऊ देणे योग्य ठरेल किंवा नाही, याबाबतचा निर्णय क्रिकेट ऑस्ट्रेलियाला घ्यावा लागेल.भारतीय क्रिकेट बोर्डाने यूएईत सप्टेंबरमध्ये आयपीएलला पुन्हा सुरुवात करण्यास मंजुरी प्रदान केली. आयपीएलच्या १४ व्या पर्वातील ३१ सामने शिल्लक आहेत.  एका वृत्तानुसार ‘अनेक लाख डॉलरचा आयपीएलचा करार असला तरी कमिन्सने यंदाच्या मोसमात टी-२० लीगमध्ये पुनरागमन करणार नसल्याचे म्हटले आहे. ईसीबीचे ॲशले जाइल्स यांनी यापूर्वीच सांगितले आहे की,  आमचे खेळाडू आयपीएलच्या १४ व्या पर्वातील उर्वरित लढतींसाठी उपलब्ध राहण्याची शक्यता कमी आहे.ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये भारतात टी-२० विश्वकप स्पर्धा होणार आहे. या पार्श्वभूमीवर क्रिकेट ऑस्ट्रेलियालासुद्धा खेळाडूंचा कार्यभार व जैविक रूपाने सुरक्षित वातावरणात येणारा थकवा या मुद्यांचा विचार करावा लागणार आहे. ऑस्ट्रेलियन खेळाडूंना कोरोना महामारीमुळे ऑस्ट्रेलियातील प्रवास निर्बंधांमुळे भारतातून मालदीवमार्गे मायदेशी परतावे लागल्यानंतर विलगीकरणात राहावे लागले होते. वृत्तानुसार बायो-बबलमध्ये अधिक वेळ घालविणे खेळाडूंच्या हिताचे ठरेल किंवा नाही याचा निर्णय सीएला घ्यावा लागणार आहे. त्यात पुढे म्हटले आहे की, आयपीएलमुळे खेळाडूंना विश्वकप स्पर्धेसाठी तयार करण्यास मदत मिळेल किंवा नाही, याचा निर्णय सीएला घ्यायचा आहे. 

टॅग्स :आयपीएल २०२१