एकदिवसीय क्रिकेटमधील वर्ल्ड चॅम्पियन ऑस्ट्रेलियाला चॅम्पियन्स ट्रॉफी आधी मोठा धक्का बसला आहे. ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्स आणि जलदगती गोलंदाज जोश हेजलवूड आयसीसीच्या आगामी मिनी वर्ल्ड कप स्पर्धेत खेळणार नाहीत. याआधी मार्कस स्टॉयनिसनं निवृत्तीची घोषणा केली तर मिचेल मार्शनंही स्पर्धेतून माघार घेतली होती. त्यामुळे आता ऑस्ट्रेलियन संघाला चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेसाठी चार नव्या चेहऱ्यांचा संघात समावेश करावा लागणार आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
वर्ल्ड चॅम्पियन ऑस्ट्रेलियाला धक्क्यावर धक्के
ऑस्ट्रेलियन संघाने २०२३ मध्ये पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखाली भारतीय मैदानात रंगलेल्या वर्ल्ड कप स्पर्धेत टीम इंडियाला शह देत जेतेपद पटकावले होते. आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेतही ऑस्ट्रेलियन संघानं फायनल गाठलीये. पण आता या वर्ल्ड चॅम्पियन संघाला धक्क्यावर धक्के बसताना दिसत असून मिनी वर्ल्ड कप स्पर्धा म्हणून ओळखली जाणाऱ्या आयसीसीच्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेआधी आता संघ अडचणीत आला आहे.
पॅट कमिन्स अन् हेजलवूड दुखापतीनं त्रस्त
ऑलराउंडर मिचेल मार्श पाठीच्या दुखापतीमुळे आधीच स्पर्धेतून आउट झाला होता. आता पॅट कमिन्स घोट्याच्या दुखापतीमुळे त्रस्त आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर गावसकर स्पर्धेतील शेवटच्या कसोटी सामन्यात त्याला दुखापत झाली होती. तो या दुखापतीतून अजूनही सावरलेला नाही. हेजलवूड हिप इंज्युरीतून अजूनही सावरलेला नाही. त्यानेही बॉर्डर गावसकर ट्रॉफी स्पर्धेतील तिसऱ्या सामन्यानंतर मालिकेतून माघार घेतल्याचे पाहायला मिळाले होते.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
कुणाच्या गळ्यात पडणार कॅप्टन्सीची माळ?
ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाच्या निवड समितीचे अध्यक्ष जॉर्ज बेली यांनी पॅट कमिन्स, जोश हेजलवूड आणि मिचेल मार्श हे तिघे दुखापतीचा सामना करत असल्यामुळे चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी संघाचा भाग नसतील, असे सांगितले आहे. या खेळाडूंच्या अनुपस्थितीत अन्य खेळाडूंना संघासाठी सर्वोत्तम कामगिरी करून धमक दाखवण्याची संधी मिळेल, असेही ते म्हणाले आहेत. पॅट कमिन्स चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतून आउट झाल्यावर आता कर्णधारपदाची धूरा कुणाकडे दिली जाणार तेही पाहण्याजोगे असेल. या शर्यतीत स्टीव्ह स्मिथ आणि ट्रॅविस हेड ही नावे आघाडीवर आहेत. श्रीलंका दौऱ्यातील कसोटी मालिकेत स्मिथकडे संघाचे नेतृत्व देण्यात आले होते. तोच चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत संघाचा कॅप्टन म्हणून दिसू शकतो.
Web Title: Pat Cummins Josh Hazlewood ruled out of ICC Champions Trophy 2025
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.