इंडियन प्रीमिअर लीग २०२४ साठी सनरायझर्स हैदराबादने नव्या कर्णधाराचे नाव जाहीर केले. भारतीय संघाला जागतीक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या व वन डे वर्ल्ड कप स्पर्धेच्या फायनलमध्ये पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाने पराभूत केले होते. आता पॅट कमिन्स आयपीएल २०२४ मध्ये सनरायझर्स हैदराबादचे नेतृत्व करणार आहे. मीनी ऑक्शनमध्ये फ्रँचायझीने कमिन्सला २०.५० कोटीत आपल्या संघात घेतले होते. आयपीएलमध्ये ४२ सामन्यांत ४५ विकेट्स घेतल्या आहेत.
सन ग्रुपचे मालक कलानिती मारन यांच्या मालकी हक्काची ही फ्रँचायझी आहे आणि २०१२ मध्ये डेक्कन चार्जर्सचे करार रद्द केल्यानंतर सनरायझर्स हैदराबादचे आयपीएलमध्ये पदार्पण झाले. सध्या डॅनिएल व्हीटोरी संघाचा प्रशिक्षक आहे आणि एडन मार्करामच्या जागी नेतृत्वाची जबाबदारी पॅट कमिन्सकडे सोपवली गेली आहे. २०१६ मध्ये या संघाने डेव्हिड वॉर्नरच्या नेतृत्वाखाली आयपीएल जेतेपद पटकावले होते. २०१८ मध्ये ते अंतिम फेरीत पोहोचले होते, परंतु चेन्नई सुपर किंग्सकडून त्यांना हार पत्करावी लागली.
पॅट कमिन्सच्या एका चेंडूची किंमत किती?
जर पॅट कमिन्सने सनरायझर्स हैदराबादसाठी साखळी फेरीतील सर्व १४ सामने खेळले तर तो त्याच्या कोट्यातील ४ षटके म्हणजेच ३३६ चेंडू टाकेल. अशा परिस्थितीत पॅट कमिन्सच्या एका चेंडूची किंमत ६.१ लाख रुपये असेल. पण जर सनरायझर्स हैदराबादने अंतिम फेरी गाठली आणि पॅट कमिन्सने सर्व सामने खेळले तर ऑस्ट्रेलियन कर्णधाराच्या एका चेंडूची किंमत पाच लाख रुपये होईल.
SRH चे IPL 2024 वेळापत्रक
२३ मार्च - कोलकाता नाइट रायडर्स वि. सनरायझर्स हैदराबाद, रात्री ८ वा. पासून, कोलकाता
२७ मार्च - सनरायझर्स हैदराबाद वि. मुंबई इंडियन्स, रात्री ८ वा. पासून, हैदराबाद
३१ मार्च - गुजरात टायटन्स वि. सनरायझर्स हैदराबाद, दुपारी ३.३० वा. पासून, अहमदाबाद