मुंबई : दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिल्या टी-२० सामन्यात सामनावीर पुरस्कार जिंकणारा अष्टपैलू हार्दिक पांड्या याने सोशल मीडियावर पोस्ट करीत गर्लफ्रेंड माहिका शर्माचे चुकीच्या अँगलने फोटो शूट केल्याबद्दल पापाराझींवर चांगलेच तोंडसुख घेतले आहे. मुंबईच्या बांद्रा येथील एका हॉटेलमधून जिन्यावरून खाली उतरत असताना माहिकाचे फोटो चुकीच्या अँगलने घेण्यात आले, असा हार्दिकचा आक्षेप आहे.
‘क्रिकेटएवढं मला काहीही प्रिय नाही’; लग्न मोडल्यानंतर स्मृती मानधनाची पहिल्यांदाच सार्वजनिक कार्यक्रमाला हजेरी
हार्दिकने इंस्टाग्राम स्टोरीवर दीर्घ नोट लिहिली. त्यात तो म्हणतो, ‘प्रसिद्ध व्यक्ती असल्याने लोकांच्या नजरा माझ्यावर असतील, हे समजू शकतो. माझ्या हालचालीदेखील टिपल्या जातीलच. पण, आज जे घडले ते फारच वाईट होते. माहिका जिन्यावरून खाली येत असताना काहींनी तिचे फोटो चुकीच्या अँगलने टिपले. कोणत्याही महिलेचे फोटो अशा पद्धतीने काढू नयेत.’ हार्दिक-माहिका यांची सोशल मीडियावर चर्चा सुरू असते. एका फोटोत दोघेही स्विमिंग पूलमध्ये दिसत आहेत. अन्य एका फोटोत दोघेही पूजा करताना दिसत आहे.