बेळगाव : येथे सुरु असलेल्या भारत ‘अ’ व श्रीलंका अ दरम्यानच्या पहिल्या अनौपचारिक कसोटीत भारताने पहिल्या दिवशी एक बाद ३७६ धावा केल्या. भारताच्या प्रियांक पांचाल (१६०) व अभिमन्यू इश्वरन (नाबाद १८९) धाव्या केल्या.
दोन सामन्यांच्या अनौपचारिक कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताच्या कर्णधार पांचालने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सामन्याच्या ८३ व्या षटकांपर्यंत भारताने विकेट गमावली नव्हती.
पांचालने २६१ चेंडूत १६० धावांची खेळी केली. त्याला विश्वा फर्नांडोने बाद केले. पांचालने आपल्या खेळीत नऊ चौकार व दोन षटकार लगावले. इश्वरनने २५० चेंडूत नाबाद १८९ धावा केल्या. त्याने आतापर्यंत १७ चौकार व तीन षटकार लगावले आहेत. पांचाल व इश्वरन यांनी पहिल्या सत्रात ११३ तर दुसऱ्या सत्रात १२५ धावा केल्या.
दिवसभराचा खेळ संपला तेव्हा जयंत यादव नऊ धावांवर खेळत होता.