Join us  

शोएब मलिकचा नवा विक्रम; ट्वेंटी-२०त एकाही पाकिस्तानीला नाही जमला असा पराक्रम

पाकिस्तानचा अनुभवी फलंदाज शोएब मलिक ( Shoaib Malik ) याने त्याच्या नावावर आणखी एका विक्रमाची नोंद केली.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 04, 2023 5:00 PM

Open in App

पाकिस्तानचा अनुभवी फलंदाज शोएब मलिक ( Shoaib Malik ) याने त्याच्या नावावर आणखी एका विक्रमाची नोंद केली. ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये १००० हून अधिक चौकार मारणारा तो पाकिस्तानचा पहिला फलंदाज ठरला आहे. नॅशनल ट्वेंटी-२० कप स्पर्धेत सिआलकोट आणि रावळपिंडी यांच्यातल्या सामन्यात मलिकने हा विक्रमाचा टप्पा ओलांडला. 

मलिकने ४४६ आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. ट्वेंटी-२०त त्याने ४८२ इनिंग्जमध्ये १००३ चौकार खेचले आहेत आणि पाकिस्तानच्या एकाही फलंदाजाला इतको चौकार खेचता आलेले नाही. जगात ७ फलंदाजांनी हा पराक्रम गाजवला आहे. ट्वेंटी-२०त ४०० षटकार खेचणारा मलिक हा एकमेव पाकिस्तानी फलंदाज आहे.  मलिक सध्या सिआलकोट संघाचे नेतृत्व सांभाळतोय आणि त्याने रविवारी १० चौकाराच्या मदतीने ५६ चेंडूंत ८४ धावांची खेळी केली आणि त्या जोरावर संघाने १६४ धावांचे लक्ष्य उभे केले. पण, मलिकची ही मेहनत पाण्यात गेली आणि रावळपिंडी संघआने १८.४ षटकांत मॅच जिंकली.  

मलिकने एकूण ४८२ ट्वेंटी-२० इनिंग्जमध्ये १२,८४३ धावा आहेत आणि त्याला ख्रिस गेलचा सर्वाधिक १४,५६२ धावांचा ( ४५५ इनिंग्ज) विक्रम मोडण्यासाठी १७१९ धावा हव्या आहेत. मलिकने १९९९मध्ये पाकिस्तानकडून पदार्पण केले होते आणि २४ वर्ष त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले. पाकिस्तानकडून सर्वाधिक काळ आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा तो खेळाडू आहे. त्याने पाकिस्तानकडून २८७ वन डे सामन्यांत ७५३४ धावा केल्या आहेत आणि १५८ विकेट्स घेतल्या आहेत.  ३५ कसोटीत त्याने १८९८ धावा केल्या आहेत आणि ३२ विकेट्स घेतल्या आहेत. ४१ वर्षीय मलिकने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२०त ४९ इनिंग्जमध्ये २४३५ धावा व २८ विकेट्स घेतल्या आहेत.

 

टॅग्स :शोएब मलिकपाकिस्तानटी-20 क्रिकेटख्रिस गेल