Join us  

पाकिस्तानच्या ' या ' आफ्रिदीने मानले राहुल द्रविडचे आभार

पाकिस्तानमध्ये आफ्रिदी या आडनावाचा फक्त शाहिदचं नाही, तर सध्या तिथल्या लीगमध्ये शाहिन आफ्रिदी हा नेत्रदीपक कामिगरी करत आहे. या शाहिननेच द्रविड यांचे आभार मानले आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2018 2:37 PM

Open in App
ठळक मुद्देशाहिनचा द्रविडशी संबंध कसा? असा प्रश्न बऱ्याच जणांना पडू शकतो. कारण द्रविडचे पाकिस्तानमधल्या लीगशी सुतराम संबंध नाही.

कराची : पाकिस्तानचा शाहिद आफ्रिदीराहुल द्रविडचे आभार का मानेल, असे तुम्हाला वाटले असेल. पण पाकिस्तानमध्ये आफ्रिदी या आडनावाचा फक्त शाहिदचं नाही, तर सध्या तिथल्या लीगमध्ये शाहिन आफ्रिदी हा नेत्रदीपक कामिगरी करत आहे. या शाहिननेच द्रविड यांचे आभार मानले आहेत.

पाकिस्तानच्या ट्वेन्टी-20 लीगमध्ये लाहोर कलंदर्स या संघाकडून खेळताना शाहिनने शुक्रवारी मुलतान-सुलतान या संघाच्या पाच फलंदाजांना बाद केले होते. 3.4 षटकांच्या आपल्या स्पेलमध्ये शाहिनने फक्त चार धावा देत पाच फलंदाजांना तंबूत धाडण्याची किमया साधली आणि संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. या दमदार कामगिरीनंतर शाहिनने आभार मानले आहेत ते द्रविडचे.

शाहिनचा द्रविडशी संबंध कसा? असा प्रश्न बऱ्याच जणांना पडू शकतो. कारण द्रविडचे पाकिस्तानमधल्या लीगशी सुतराम संबंध नाही. पण तरीही शाहिनने द्रविडचे आभार मानले आहेत. शाहिन हा युवा विश्वचषक (19-वर्षांखालील) पाकिस्तानच्या संघाकडून खेळत होता. त्यावेळी त्याची द्रविड यांच्याशी भेट झाली होती. भारत आणि पाकिस्तान या स्पर्धेत दोनदा समोरासमोर आले होते. या दोन्ही सामन्यांमध्ये भारताने पाकिस्तानला पराभूत केले होते.

" न्यूझीलंडमध्ये युवा विश्वचषक खेळत असताना द्रविड यांनी माझी गोलंदाजी पाहिली होती. त्यावेळी त्यांनी मला काही गोष्टींमध्ये मार्गदर्शनही केले होते. त्यांच्या या मार्गदर्शनाचा मला या लीगमध्ये खेळाताना चांगलाच फायदा होत आहे. त्यामुळे मला जे यश मिळत आहे, त्यामध्ये त्यांचाही वाटा आहे. त्यामुळेच त्यांचे धन्यवाद मानणे, हे माझे कर्तव्य आहे," असे शाहिन म्हणाला.

टॅग्स :राहूल द्रविडशाहिद अफ्रिदी