Join us
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तानच्या फलंदाजाचा World Record; करून दाखवली आतापर्यंत कुणालाही न जमलेली कामगिरी 

सामन्याचे पहिले तीन दिवस लंकेच्या फलंदाजांना फलंदाजी करायला मिळाली. पावसाच्या व्यत्ययामुळे पहिल्या तीन दिवसांत केवळ 91.5 षटकांचा सामना झाला.

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2019 16:51 IST

Open in App

पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यात रावळपिंडी स्टेडियमवर कसोटी सामना सुरू आहे. या कसोटी सामन्यातील तीन दिवस पावसानं वाया घालवले असले तरी अखेरच्या दिवशी वर्ल्ड रेकॉर्डची नोंद झालेली पाहायला मिळाले. पाकिस्तानचा फलंदाज अबीद अली यानं हा विश्वविक्रम केला. त्यानं श्रीलंकेच्या 6 बाद 308 धावांच्या प्रत्युत्तरात शतकी खेळी करताना हा विक्रम नावावर केला. अबीदचा हा पहिलाच आंतरराष्ट्रीय कसोटी सामना होता आणि त्यात त्यानं पहिले कसोटी शतक झळकावलं. त्याच्या या खेळीनं आतापर्यंत कुणालाही न जमलेल्या विश्वविक्रमाची नोंद केली. काय आहे हा विक्रम चला पाहूया...

प्रथम फलंदाजीला आलेल्या लंकेनं पहिला डाव 6 बाद 308 धावांवर घोषित केला. सामन्याचे पहिले तीन दिवस लंकेच्या फलंदाजांना फलंदाजी करायला मिळाली. पावसाच्या व्यत्ययामुळे पहिल्या तीन दिवसांत केवळ 91.5 षटकांचा सामना झाला. चौथ्या दिवसाचा खेळ झालाच नाही. त्यामुळे पाचव्या दिवशी लंकेनं डाव घोषित केला. लंकेकडून धनंजया डी सिल्वानं नाबाद 102 धावा केल्या. कर्णधार दिमुथ करुणारत्ने ( 59) आणि ओशादा फर्नांडो ( 40) यांनी योग्य साथ दिली. पाकिस्तानची सुरुवात निराशाजनक झाली असली तरी अबीद अली आणि बाबर आझम यांनी तुफानी खेळी केली. अबीदनं शतकी खेळी करताना विक्रम नोंदवला. पाकिस्ताननं  2 बाद 252 धावा करून सामना अनिर्णीत राखला. आझमनेही नाबाद 102 धावा केल्या. अबीदनं नाबाद 109 धावा केल्या.

कसोटी आणि वन डे क्रिकेटच्या पदार्पणात शतक झळकावणारा तो पहिलाच फलंदाज ठरला. असा पराक्रम जगातल्या कोणत्याच फलंदाजाला करता आलेला नाही. त्यानं मार्च 2019मध्ये वन डे पदार्पणात ऑस्ट्रेलियाविरुद्ध 112 धावा केल्या होत्या. 

टॅग्स :पाकिस्तानश्रीलंका