पाकिस्तानी महिला म्हणाली कोण विराट? पाक चाहत्याने दिलं सडेतोड उत्तर

भारतीय कर्णधार विराट कोहलीनं शिक्षक दिनाच्या दिवशी एक ट्विट केलं होतं. ज्या क्रिकेटर्सना पाहून तो लहानाचा मोठा झाला, ज्यांच्या खेळाचा प्रभाव त्याच्यावर होता त्या सगळ्यांप्रती त्याने आपली भावना व्यक्त केली होती.

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2017 18:49 IST2017-09-11T18:45:51+5:302017-09-11T18:49:03+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
Pakistani women said who is Virat? Pakistani fans gave a befitting reply | पाकिस्तानी महिला म्हणाली कोण विराट? पाक चाहत्याने दिलं सडेतोड उत्तर

पाकिस्तानी महिला म्हणाली कोण विराट? पाक चाहत्याने दिलं सडेतोड उत्तर

नवी दिल्ली, दि. 11 - भारतीय कर्णधार विराट कोहलीनं शिक्षक दिनाच्या दिवशी एक ट्विट केलं होतं. ज्या क्रिकेटर्सना पाहून तो लहानाचा मोठा झाला, ज्यांच्या खेळाचा प्रभाव त्याच्यावर होता त्या सगळ्यांप्रती त्याने आपली भावना व्यक्त केली होती. यामध्ये जगातील प्रत्येक देशातील खेळाडूंचा समावेश होता. ज्यांना पाहून विराट कोहली क्रिकेट शिकला अशा प्रत्येक खेळाडूच नाव यामध्ये होतं.

या यादीत पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू इम्रान खान, जावेद मियाँदाद आणि इंजामम-उल-हक यांच्या नावाचाही समावेश होता. विराटचं हे ट्विट पाकिस्तानच्या सोशल मीडियावरही व्हायरल झालं. अर्थात या ट्विटवरून अनेकांनी विराटवर टीका करण्याचा प्रयत्न केला. यामध्ये एका पाकिस्ताने महिलेनं ट्विट करत कोण आहे हा? असा प्रश्न उपस्थित केला. तिच्या या प्रश्नाला पाकमधील विराटच्या चाहत्याने सडेतोड उत्तर देत बोलती बंद केली.
सयैदा आलिया अहमद या पाकिस्तानी महिलेने हे ट्विट केलं. या मध्ये ती म्हणते, जर कोणाचा आक्षेप नसेल तर ट्विट करणारा हा सज्जन माणूस आहे तरी कोण असा मला प्रश्न विचारावासा वाटतो? पण तिचा हा खोचक प्रश्न पाकिस्तानमधल्या विराटच्या चाहत्यांना काही रुचला नाही. तिच्या या ट्विटला एका पाकिस्तानी चाहत्यानी सडेतोड उत्तर दिलं.

पाकमधील विराटचा चाहता असलेला फरिद याने सयैदा आलिया अहमद च्या ट्विटला उत्तर दिले. हा विराट कोहली असून भारतीय क्रिकेट संघाचा तो कर्णधार आहे. तो उत्तम बॅट्समन आहे आणि त्याच्यापाठीमागे भिंतीवर दिग्गज खेळाडूंचं नाव लिहिलं आहे. सयैदाला दिलेल्या या सडेतोड उत्तरामुळे त्याने सगळ्यांचंच मन जिंकलं आहे. फरिदाच्या या उत्तरानं विराटचे फक्त भारतातच नाही तर पाकिस्तानमध्येदेखील तितकेच चाहते आहे हे दिसून येत.




विराटसाठी पाकमध्ये फडकला होता तिरंगा
विराट कोहलीवरील आपलं प्रेम व्यक्त करण्यासाठी त्याच्या एका पाकिस्तानी चाहत्यानं आपल्या घराच्या गच्चीवर भारताच्या प्रजासत्ताक दिनी चक्क तिरंगा फडकावण्याचा पराक्रम केला होता. या प्रकारानंतर स्थानिक पोलिसांनी लगेचच त्याला ताब्यात घेत त्याची रवानगी थेट पोलीस कोठडीतच करण्यात आली होती. उमर दराज हा तरुण पाकिस्तानातील पंजाब प्रांतातल्या ओकाडा जिल्ह्यात राहतो. तो क्रिकेटवेडा आहेच, पण त्यापेक्षा विराट कोहलीचा कट्टर चाहता आहे. कोहलीची स्टाइल आणि बॅटिंग दोन्ही त्याला प्रचंड आवडतं. आपल्या या 'हिरो'चे भरप्पूर फोटो त्यानं जमा केलेत, घरातल्या भिंतींवर चिकटवलेत. काल तर कोहलीवरचं प्रेम व्यक्त करण्यासाठी त्यानं भलतंच धाडस केलं.

Web Title: Pakistani women said who is Virat? Pakistani fans gave a befitting reply

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.