Join us

सेहवागला शिवीगाळ करणाऱ्या या पाकिस्तानी क्रिकेटपटूने धोनीवर केली टीका

पाकिस्तानचा हा माजी क्रिकेटपटू सध्या तेथील ट्वेन्टी-20 लीगमध्ये कराची किंग्ज संघाचा मार्गदर्शक आहे. हा पाकिस्तानचा माजी खेळाडू म्हणजे रशिद लतिफ.

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2018 19:27 IST

Open in App
ठळक मुद्देभारताचा धडाकेबाज सलामीवीर वीरेंद्र सेहवागला पाकिस्तानच्या या माजी क्रिकेटपटूने शिवीगाळ केली होती.

कराची : भारताचा धडाकेबाज सलामीवीर वीरेंद्र सेहवागला पाकिस्तानच्या या माजी क्रिकेटपटूने शिवीगाळ केली होती. त्याच पाकिस्तानच्या या क्रिकेटपटूने आता भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीवर टीका केली आहे. 

पाकिस्तानचा हा माजी क्रिकेटपटू सध्या तेथील ट्वेन्टी-20 लीगमध्ये कराची किंग्ज संघाचा मार्गदर्शक आहे. हा पाकिस्तानचा माजी खेळाडू म्हणजे रशिद लतिफ. भारताला दोन विश्वचषक जिंकवून देणाऱ्या धोनीवर त्याने केलेली टीका ही कदाचित क्रिकेट चाहत्यांच्या पचनी पडणार नाही.

धोनीबाबत लतिफ म्हणाला की, " धोनी हा खेळाडू म्हणून नक्कीच चांगला आहे. क्रिकेट विश्वात नक्कीच त्याची उदाहरणे दिली जातील. तो एक चांगला कर्णधारही आहे. कारण त्याच्या नेतृत्वाखाली भारताने बरेच सामने जिंकले आहेत. कोणतीही परिस्थिती तो उत्तमपद्धतीने हाताळू शकतो. त्यांचा शांतपणा सर्वांनाच भावतो. तो एक व्यक्ती म्हणूनही चांगला आहे. पण धोनी हा क्रिकेट जगतातील सर्वोत्तम यष्टीरक्षक नाही. कारण त्याच्यापेक्षा चांगला यष्टीरक्षक सध्या क्रिकेट जगतात आहे. धोनीपेक्षा सध्याच्या घडीला दक्षिण आफ्रिकेचा क्विंटन डी कॉक हा चांगला यष्टीरक्षक आहे. "

टॅग्स :महेंद्रसिंह धोनी