Join us  

Pakistani Cricketer, IND vs SA: "रोहित नसल्याने टीम इंडियात एनर्जीच नाही, ही सिरीजही हारणार की काय?"; पाकिस्तानी माजी क्रिकेटपटूने डिवचलं

भारताचा पहिल्या वन डे मध्ये दक्षिण आफ्रिकेने केला सहज पराभव, मालिकेत घेतली १-०ची आघाडी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2022 6:47 PM

Open in App

Pakistani Cricketer on Team India: दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या पहिल्या सामन्यात टीम इंडियाला दारूण पराभवाला सामोरे जावे लागले. भारताची गोलंदाजी आणि फलंदाजी दोन्हीही फारसे चांगले झाले नाही. टीम इंडियाच्या या पराभवावर पाकिस्तानचा माजी क्रिकेटर सलमान बटने आपलं मत मांडलं. टीम इंडियाला वनडेमध्ये रोहित शर्माची उणीव जाणवत असल्याचं सलमान बटने म्हटलं. रोहित शर्माच्या अनुपस्थितीमुळे भारतीय संघाचे मनोधैर्य खचल्याचेही माजी पाकिस्तानी क्रिकेटपटू बट म्हणाला.

सलमान बट पुढे म्हणाला की, रोहित शर्मा आणि विराट कोहली हे जागतिक दर्जाचे खेळाडू आणि लीडर आहेत. पण आताच्या घडीला टीम इंडियाची ऊर्जा सध्या कमी असल्याचं दिसतंय. आता अशा परिस्थितीत भारताने जर मालिका गमावली तर काय होईल? टीम इंडियाने आपल्या कोणत्याही दौऱ्यात दोन्ही फॉरमॅटमध्ये मालिका पराभूत होण्याची शेवटची वेळ कधी आली होती? हा विचारच करावा लागेल.

दरम्यान, टीम इंडियाचा टी२० आणि वन डे संघाचा नवा कर्णधार रोहित शर्मा दुखापतग्रस्त आहे. याच कारणामुळे तो आफ्रिका दौऱ्यात सहभागी होऊ शकला नाही. रोहित शर्माच्या अनुपस्थितीत केएल राहुल टीम इंडियाचे नेतृत्व करत आहे. त्याच्या नेतृत्वाखाली पहिल्या एकदिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिकेने फलंदाजी करताना २९६ धावा केल्या. प्रत्युत्तरात टीम इंडियाची मधली फळी पूर्णपणे ढेपाळली. भारताकडून केवळ शिखर धवन, विराट कोहली आणि शार्दुल ठाकूर यांनी अर्धशतके झळकावली, पण तरीह भारताचा ३१ धावांनी पराभव झाला.

टॅग्स :भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकारोहित शर्माविराट कोहलीलोकेश राहुल
Open in App