Cricketer Heart Attack: लाईव्ह सामन्यादरम्यान पाकिस्तानी क्रिकेटपटूचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

Pakistani Cricketer Heart Attack News: लाईव्ह सामन्यादरम्यान एका पाकिस्तानी क्रिकेटपटूचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याने क्रिकेटविश्वात शोककळा पसरली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2025 13:58 IST2025-05-07T13:56:50+5:302025-05-07T13:58:55+5:30

whatsapp join usJoin us
Pakistani Cricketer dies of heart attack during PCB Challenge Cup match | Cricketer Heart Attack: लाईव्ह सामन्यादरम्यान पाकिस्तानी क्रिकेटपटूचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

Cricketer Heart Attack: लाईव्ह सामन्यादरम्यान पाकिस्तानी क्रिकेटपटूचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

क्रिकेटविश्वातून एक दुःखद बातमी समोर आली. लाईव्ह सामन्यादरम्यान एका पाकिस्तानी क्रिकेटपटूचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. पाकिस्तानमध्ये खेळल्या जात असलेल्या पीसीबी चॅलेंज कपदरम्यान संबंधित क्रिकेटपटूचा हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर ताबडतोब त्याला रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, तोपर्यंत खूप उशीर झाला. उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. या घटनेने पाकिस्तान क्रिकेटमध्ये शोककळा पसरली. 

पाकिस्तानी माध्यमांच्या वृत्तानुसार, अलीम खान असे मृत्यू झालेल्या युवा क्रिकेटपटूचे नाव आहे, ज्याला सामन्यादरम्यान हृदयविकाराचा झटका आला. पीसीबी चॅलेंज कपदरम्यान त्याला हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. परंतु, तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडून अद्याप याबाबत कोणतीही माहिती देण्यात आली नाही.

काही दिवसांपूर्वी बांगलादेशचा माजी कर्णधार तमीम इक्बालचीही एका सामन्यादरम्यान प्रकृती बिघडली. छातीत दुखू लागल्याने त्याला रुग्णालयात नेण्यात आले. प्राथमिक उपचार घेतल्यानंतर तो लगेच स्टेडियममध्ये परतला. पण नंतर त्याला हृदयविकाराचा झटका आला. तो ढाका प्रीमियर डिव्हिजनमध्ये मोहम्मद स्पोर्टिंग क्लबकडून खेळत असताना हा प्रकार घडला. हृदयविकाराच्या झटक्यानंतर त्यांना अँजिओप्लास्टी करावी लागली.

पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरुद्ध अनेक कठोर पावले उचलली. भारतात पाकिस्तानी मीडियासह अनेक क्रिकेटपटूंच्या यूट्यूब चॅनेलवर बंदी घालण्यात आली. भारतात पीएसएलचे प्रसारण आणि स्ट्रीमिंग बंदी घालण्यात आली, त्याचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म देखील भारतात ब्लॉक करण्यात आले. बाबर आझमसह अनेक खेळाडूंच्या सोशल मीडियावरही बंदी घालण्यात आली.

Web Title: Pakistani Cricketer dies of heart attack during PCB Challenge Cup match

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.