Join us

पाक क्रिकेटर बलात्कार प्रकरणात अडकला; पोलिसांनी मॅच सुरु असतानाच ठोकल्या बेड्या

पाकिस्तानकडून आंतरराष्ट्रीय सामनेही खेळलाय हा क्रिकेटर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2025 11:35 IST

Open in App

पाकिस्‍तानी क्रिकेटर बलात्काराच्या गंभीर आरोपामुळे अडकला आहे. इंग्लंड दौऱ्यावरील वनडे सामन्यात खेळत असतानाच स्थानिक पोलिसांनी २४ वर्षीय क्रिकेटरला अटक करण्यात आली. या कारवाईनंतर  पासपोर्ट ताब्यात घेऊन जामिनावर त्याची सुटका झाल्याचे समजते. या प्रकरणाचा ब्रिटन पोलिस तपास करत असून पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने  संबंधित क्रिकेटरवर निलंबनाची कारवाई केली आहे.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

पोलिसांनी काय म्हटलंय?

ग्रेटर मँचेस्‍टर पोलिसांनी आपल्या निवेदनात म्हटलंय की, २४ वर्षीय व्यक्तीला बलात्काराच्या आरोपात अटक केली आहे. २३ जुलै २०२५ रोजी मँचेस्टर परिसरात संबंधित घटना घडली, असा आरोप त्याच्यावर आहे. अटकेच्या कारवाईनंतर त्याची जामिनावर सुटका करण्यात आली असून आम्ही या प्रकरणाची सखोल चौकशी करत आहोत, असे पोलिसांनी म्हटले आहे. पाकिस्तानी वंशाच्या तरुणीनं केलेल्या गंभीर आरोपानंतर तक्रार दाखल करुन तपास सुरु केला असला तरी पोलिसांनी क्रिकेटरच नाव सांगितलेले नाही.

अटकेनंतर जामिनावर सुटका, पण...

टेलीकॉम आशिया स्‍पोर्ट्सच्या वृत्तानुसार, पाकिस्तानी क्रिकेटरला बेकहॅम ग्राउंडवर वनडे सामना सुरु असताना अटक करण्यात आली. पाकिस्तानी शाहीन संघ २७ जुलै ते ६ ऑगस्ट २०२५ या कालावधीत इंग्लंड दौरा केला. या दरम्यानच हा धक्कादायक प्रकार घडला असा आरोप क्रिकेटरवर करण्यात आला आहे. अटकेच्या कारवाईनंतर त्याची जामिनावीर सुटका झाली असली तरी पासपोर्ट जप्त करण्यात आला असून क्रिकेटरसह पाकिस्तान बोर्डानेही तपासात पूर्ण सहकार्य करण्याची तयारी दर्शवली आहे.

पाकिस्तानकडून आंतरराष्ट्रीय सामनेही खेळलाय हा क्रिकेटर

या क्रिकेटरनं २०२० मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. आतापर्यंत त्याने पाकिस्तानकडून २ वनडे आणि ३५ टी-२० सामने खेळले आहेत. आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये त्याने ३ अर्धशतकाच्या मदतीने ५०५ धावा केल्या आहेत. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याने २७ सामन्यात ४७ पेक्षा अधिक सरासरीसह १७९७ धावा काढल्या आहेत.  

टॅग्स :ऑफ द फिल्डपाकिस्तान