Join us

"भारताला हरवा आणि माझ्याशी लग्न करा", पाकिस्तानी अभिनेत्रीची झिम्बाब्वेला ऑफर

टी-20 विश्वचषकात आज पाकिस्तानच्या संघाने दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2022 19:00 IST

Open in App

नवी दिल्ली : टी-20 विश्वचषकात काल पाकिस्तानच्या संघाने दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला आहे. मात्र तरीदेखील शेजाऱ्यांच्या संघाला उपांत्य फेरी गाठणे कठीण आहे. कारण त्यांच्या वाटेत बांगलादेशचे मोठे आव्हान असणार आहे. परंतु कालच्या विजयामुळे पाकिस्तानी संघाच्या उपांत्य फेरीत पोहचण्याच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. दरम्यान, आपल्या वादग्रस्त ट्विटमुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेली पाकिस्तानी अभिनेत्री सेहर शिनवारीचे आणखी एक ट्विट व्हायरल होत आहे. 

खरं तर शिनवारीने पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका यांच्या सामन्याच्या पूर्वसंध्येला एक भन्नाट ट्विट केले होते. तिने म्हटले की, पुढच्या सामन्यात झिम्बाब्वेच्या संघाने भारतीय संघाचा पराभव केला तर ती झिम्बाब्वेच्या मुलाशी लग्न करेल. त्याच्या या ट्विटनंतर युजर्सनी त्याला ट्रोल केले. एका युजरने कमेंटद्वारे म्हटले की, मग तुझे लग्न होत नसल्याने मला दुःख होईल. 

 रविवारी 6 नोव्हेंबर रोजी भारत विरूद्ध झिम्बाब्वे असा सामना होणार आहे. या विश्वचषकात भारतीय संघ शानदार फॉर्ममध्ये आहे. भारताने आपल्या सलामीच्या सामन्यात पाकिस्तानचा पराभव केला होता. या पराभवानंतर पाकिस्तानी चाहते भारतीय संघावर मोठ्या प्रमाणात टीका करत आहेत. भारत-बांगलादेश सामना सुरू असताना देखील सेहर शिनवारीने सलग ट्विट केली होती. भारतीय संघ हा सामना हरला पाहिजे अशी ती प्रार्थना करत होती. मात्र भारताने रोमहर्षक लढतीत बांगलादेशचा पराभव केला.

अशा परिस्थितीत आणखी एका युजरने सेहरला तिच्या जुन्या ट्विटची आठवण करून दिली. ज्यामध्ये तिने म्हटले की, जर भारताने बांगलादेशला हरवले तर ती तिचे ट्विटर अकाउंट डिलीट करेल. सेहरला पाकिस्तानी चाहत्यांनीही ट्रोल केले आहे. 

 

टॅग्स :ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२२भारत-झिम्बाब्वेपाकिस्तानट्रोल
Open in App