Join us

Pakistan write ‘UAE 2021’ instead of ‘India 2021’ : पाकिस्तानला 'भारता'चे वावडेच; ट्वेंटी-२० वर्ल्ड कप संघाच्या जर्सीवरून Indiaचे नाव हटवले

ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेचे यजमानपद भारताकडे आहे, परंतु कोरोना व्हायरसमुळे ही स्पर्धा ओमान व यूएई येथे बीसीसीआयच्या यजमानपदाखालीच खेळवली जात आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2021 16:38 IST

Open in App

भारत आणि पाकिस्तान या दोन शेजाऱ्यांचे भांडण हे क्रिकेटच्या मैदानाबाहेरही आहे. पाकिस्तानातून दहशतवादींना मिळणारे खतपाणी, यामुळे भारतानं त्यांच्याशी सर्व संबंध तोडले आहेत. त्यामुळेच आयसीसी स्पर्धांमध्येच नाईलाजानं भारताला त्यांच्याविरुद्ध खेळावं लागत आहे. आता २४ ऑक्टोबरला ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत भारत-पाकिस्तान यांच्यात महामुकाबला होणार आहे. पण, या लढतीपूर्वीच पाकिस्तानी संघाला 'India' या नावाचेच वावडे असल्याचे दिसून आले आहे. आगामी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठीच्या जर्सीवरून पाकिस्तान संघानं भारताचं नावच काढून टाकल्याला धक्कादायक प्रकार घडला आहे. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आजम ( Babar Azam T20 World Cup Jersey) यानं घातलेली वर्ल्ड कप जर्सीच्या फोटोतून ही बाब समोर आली आहे.

ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेचे यजमानपद भारताकडे आहे, परंतु कोरोना व्हायरसमुळे ही स्पर्धा ओमान व यूएई येथे बीसीसीआयच्या यजमानपदाखालीच खेळवली जात आहे. १७ ऑक्टोबरपासून या स्पर्धेला सुरुवात होणार आहे आणि पाकिस्तान स्पर्धेतील पहिला सामना टीम इंडियाविरुद्धच खेळणार आहे. या स्पर्धेसाठी पाकिस्ताननं तयार केलेल्या जर्सीवर India 2021 एवजी UAE 2021 असे लिहिलेलं आहे. विशेष म्हणजे नेदरलँड्स, ओमान, ऑस्ट्रेलिया यांच्यासह सर्व देशांच्या जर्सीवर भारताचेच नाव आहे. त्यामुळे आता पाकिस्तान त्यांच्या जर्सीवरील ही चूक सुधारतं का हे पाहावे लागेल. 

पाकिस्तानचा वर्ल्ड कप संघ - बाबर आझम, आसीफ अली, खुशदील शाह, मोहम्मद हाफिज, सोहैब मक्सूद, आझम खान, मोहम्मद रिझवान, इमाद वासीम, मोहम्मद नवाझ, मोहम्मद वासीम, शाबाद खान, हॅरीस रौफ, हसन अली, मोहम्मद हस्नैन, शाहिन शाह आफ्रिदी 

टॅग्स :ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२१पाकिस्तान
Open in App