Join us  

श्रीलंकेचा गोलंदाज पडला, पण अचूक चेंडू टाकून पाकिस्तानी फलंदाजाचा दांडा उडवला, Video

Pakistan vs Sri Lanka Live Marathi : पाकिस्तानने आशिया चषक २०२३ स्पर्धेतील करो वा मरो सामन्यात श्रीलंकेविरुद्ध प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2023 5:53 PM

Open in App

Pakistan vs Sri Lanka Live Marathi : पाकिस्तानने आशिया चषक २०२३ स्पर्धेतील करो वा मरो सामन्यात श्रीलंकेविरुद्ध प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पावसामुळे हा सामना सव्वा दोन तास उशीराने सुरू करण्यात आल्याने ४५-४५ षटकांची मॅच खेळवण्याचा निर्णय घेतला गेला. या सामन्यातील विजेता संघ १७ सप्टेंबरला भारताविरुद्ध फायनल खेळेल. पाकिस्तानने महत्त्वाच्या सामन्यासाठी आज प्लेइंग इलेव्हनमध्ये बरेच बदल केलेले पाहायला मिळाले. काल प्लेइंग इलेव्हनमधून गायब असलेला फखर जमान आज पुन्हा संघात परतला. झमन खान आज पदार्पण करतोय. पण, प्रमोद मदुशानने तिसऱ्या षटकात फखरचा ( ४) त्रिफळा उडवला. 

फखरला त्याच्या खराब फॉर्ममुळे आजच्या सामन्यात वगळण्यात आले होत, परंतु इमाम-उल-हकला उसण भरली अन् फखरला संधी मिळाली. मागील १० वन डे सामन्यांत त्याने १९च्या सरासरीने १९० धावा केल्या आहेत. आशिया चषक स्पर्धेत त्याची कामगिरी ही ४ ( ११) वि. श्रीलंका, २७ ( ५०) वि. भारत, २० ( ३१) वि. बांगलादेश, १४ ( २०) वि. नेपाळ अशी राहिली आहे.  मे महिन्यापासून त्याने एकही ५०+ धावा केलेल्या नाही.

 

 

 

टॅग्स :एशिया कप 2023पाकिस्तानश्रीलंका