PSL Video: कॅमेरासमोर अचानक पाकिस्तानी खेळाडूने केलं विचित्र कृत्य, अँकर Zainab Abbas थोडक्यात बचावली!

तिने स्वत:चा बचाव करण्यासाठी हात पुढे केलेच होते, इतक्यात...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2023 05:46 PM2023-02-25T17:46:20+5:302023-02-25T17:47:34+5:30

whatsapp join usJoin us
pakistan super league 2023 hasan ali fun with azam khan beautiful hot anchor zainab abbas viral video | PSL Video: कॅमेरासमोर अचानक पाकिस्तानी खेळाडूने केलं विचित्र कृत्य, अँकर Zainab Abbas थोडक्यात बचावली!

PSL Video: कॅमेरासमोर अचानक पाकिस्तानी खेळाडूने केलं विचित्र कृत्य, अँकर Zainab Abbas थोडक्यात बचावली!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Zainab Abbas, PSL Video पाकिस्तान सुपर लीगमध्ये सध्या दमदार क्रिकेट पाहायला मिळत आहे. फलंदाज दमदार फलंदाजी करत आहेत, गोलंदाज अप्रतिम कामगिरी करताना दिसत आहेत. यासोबतच धमाल-मजा-मस्तीही जोरात सुरू आहे. पीएसएल हा एक असा प्रकार आहे, ज्यात काही ना काही घडतच असते. काही दिवसांपूर्वी पाकिस्तानी कर्णधार बाबर आझमने मॅच सुरू असताना सहकारी खेळाडूला आपली बॅट दाखवली. आता तर हद्दच झाली. सुंदर अँकर मुलाखत घेत असताना एक खेळाडू चक्क कॅमेरासमोर आणि लाइव्ह प्रक्षेपणाच्या दरम्यान गाल ओढत पळून गेला. गाल ओढतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

इस्लामाबादने क्वेटाचा ६३ धावांनी पराभव केला. आझम खानच्या (Azam Khan) झंझावाती खेळीमुळे प्रथम फलंदाजी करताना इस्लामाबादने ६ गडी गमावून २२० धावा केल्या. आझमने ४२ चेंडूत ९७ धावा ठोकल्या. प्रत्युत्तरात क्वेटाचा संघ १९.१ षटकांत १५७ धावांत गारद झाला. आझम सामनावीर ठरला.

नक्की काय घडला प्रकार?

झैनाब अब्बास इस्लामाबाद युनायटेड आणि क्वेटा ग्लॅडिएटर्स यांच्यात झालेल्या सामन्याचे अँकरिंग करत होती. विजयानंतर झैनाब कॅमेऱ्यासमोर आझमशी त्याच्या खेळीबद्दल बोलत होती. ती त्याला प्रश्न विचारत होती, तेवढ्यात हसन अली धावत आला आणि पटकन आझमचे गाल ओढून पळून गेला. काही सेकंद झैनाबला अचानक काय झाले ते समजलेच नाही. हसन इतक्या वेगाने धावला की तो तिला आदळलाच असता, पण झैनाबने त्याला आपल्या हाताने पटकन थांबवण्याचा प्रयत्न केला आणि ती थोडक्यात बचावली. हसन अली (Hasan Ali) पुढे निघून गेला, पण त्यानंतर झैनाबला आपले हसू आवरता आले नाही.

आझम आणि हसन यांची दमदार कामगिरी

आझमबद्दल बोलायचे झाले तर त्याच्या बॅटमधून सतत धावा निघत आहेत. जरी त्याचे शतक हुकले असेल तरी तो डावाच्या शेवटच्या चेंडूवर ओडियन स्मिथच्या गोलंदाजीवर बाद झाला. दुसरीकडे हसन अलीही चेंडूने दमदार कामगिरी करताना दिसला. या सामन्यात त्याने ३९ धावांत ३ बळी घेतले. गेल्या सामन्यातही हसनने ३ बळी घेत अप्रतिम कामगिरी केली होती.

Web Title: pakistan super league 2023 hasan ali fun with azam khan beautiful hot anchor zainab abbas viral video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.