Join us  

Pakistan squad for T20 World Cup 2022 : पाकिस्तानचा वर्ल्ड कप संघ जाहीर, भारताला टक्कर देण्यासाठी स्टार गोलंदाजाची निवड 

Pakistan squad announced for T20 World Cup 2022 : पाकिस्तान संघाने अखेर डेड लाईनच्या अखेरच्या दिवशी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी संघ जाहीर केला.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2022 5:48 PM

Open in App

Pakistan squad announced for T20 World Cup 2022 : पाकिस्तान संघाने अखेर डेड लाईनच्या अखेरच्या दिवशी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी संघ जाहीर केला. पाकिस्तानचा वर्ल्ड कप स्पर्धेत पहिल्याच लढतीत कट्टर प्रतिस्पर्धी भारताशी सामना होणार आहे. त्यामुळे पाकिस्तानने तगडा संघ निवडला आहे. दुखापतीमुळे आशिया चषक स्पर्धेला मुकलेला शाहीन शाह आफ्रिदीचे ( Shaheen Shah Afridi) संघात पुनरागमन झाले आहे. पण, २०१७च्या चॅम्पियन्स ट्रॉफीतील स्टार खेळाडू फाखर जमानला राखीव खेळाडू म्हणून निवडल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. आशिया चषक २०२२ स्पर्धेत पाकिस्तानला उप विजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. जवळपास तोच संघ वर्ल्ड कप खेळणार आहे. 

ऑस्ट्रेलियात १६ ऑक्टोबर ते १३ नोव्हेंबर २०२२ या कालावधीत वर्ल्ड कप पार पडणार आहे.  एडलेड, ब्रिस्बन, गिलाँग, होबार्ट, मेलबर्न, पर्थ आणि सिडनी या सात शहरांमध्ये ४५ सामने खेळवण्यात येणार आहेत. उपांत्य फेरीचा सामना सिडनी क्रिकेट ग्राऊंड व अ‍ॅडलेड ओव्हल येथे अनुक्रमे ९ व १० नोव्हेंबरला खेळवण्यात येईल. मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर १३ नोव्हेंबरला अंतिम सामना खेळवला जाईल. 

ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील विजेता ऑस्ट्रेलिया, उपविजेता न्यूझीलंड यांच्यासह अफगाणिस्तान, बांगलादेश, इंग्लंड, भारत, पाकिस्तान व दक्षिण आफ्रिका यांना ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२२च्या Super 12 मध्ये थेट प्रवेश मिळाला आहे. नामिबिया, स्कॉटलंड, श्रीलंका आणि वेस्ट इंडिज यांना पहिल्या राऊंडमध्ये खेळावे लागेल. ओमान ( फेब्रुवारी) आणि झिम्बाब्वे ( जून व जुलै) येथे दोन पात्रता स्पर्धा होणार आहेत आणि त्यातून संघ  पहिल्या राऊंडमध्ये Super 12मधील अंतिम चार संघांसाठी एकमेकांना आव्हान देतील.

शाहिन आफ्रिदी, नसीम शाह व हॅरीस रौफ या त्रिकुटाच्या जोरावर पाकिस्तान भारतीय संघाची कोंडी करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा सुरू झाली आहे. मागील वर्ल्ड कपमध्ये आफ्रिदीने भारताला दिलेले दणके अजूनही चाहत्यांच्या मनात ताजे आहेत. 

पाकिस्तानचा संघ -बाबर आजम ( कर्णधार), शादाब खान ( उप कर्णधार), आसीफ अली, हैदर अली, हॅरीस रौफ, इफ्तिखार अहमद, खुशदील शाह, मोहम्मद हस्नैन, मोहम्मद नवाज, मोहम्मद रिझवान, मोहम्मद वासीम, नसीम शाह, शाहीन शाह आफ्रिदी, शान मसूद, उस्मान कादीर ( T20 World Cup squad: Babar Azam (c), Shadab Khan (vc), Asif Ali, Haider Ali, Haris Rauf, Iftikhar Ahmed, Khushdil Shah, Mohammad Hasnain, Mohammad Nawaz, Mohammad Rizwan, Mohammad Wasim, Naseem Shah, Shaheen Shah Afridi, Shan Masood, Usman Qadir). राखीव - फाखर जमान, मोहम्मद हॅरीस, शाहनवाज दहानी ( Reserves: Fakhar Zaman, Mohammad Haris, Shahnawaz Dahani) 

पाकिस्तानचे वेळापत्रक२३ ऑक्टोबर - वि. भारत, मेलबर्न२७ ऑक्टोबर - वि. ब गटातील विजेता, पर्थ३० ऑक्टोबर - वि. अ गटातील उपविजेता, पर्थ३ नोव्हेंबर - वि. दक्षिण आफ्रिका, सिडनी६ नोव्हेंबर - वि. बांगलादेश, एडिलेड

टॅग्स :ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२2पाकिस्तानबाबर आजमआयसीसी विश्वचषक टी-२०
Open in App