Rachin Ravindra Injury Controversy Pakistan : लाहोरच्या गद्दाफी स्टेडियमवर पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यादरम्यान न्यूझीलंडचा रचिन रवींद्र गंभीर जखमी झाला. कॅच पकडण्याच्या प्रयत्नात चेंडू त्याच्या चेहऱ्यावर आदळला. त्यामुळे मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला. रक्तबंबाळ झालेल्या रचिन रवींद्रला मैदानाबाहेर नेण्यात आले. Champions Trophy 2025 च्या आधी घडलेल्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि पाकिस्तानच्या आयोजनावर टीका करण्यात आली. या टीकेला पाकिस्तानचे आजी-माजी खेळाडू उत्तर देत आहेत. तशातच पाकिस्तानच्या माजी कर्णधाराने केलेल्या एका विधानामुळे वाद निर्माण झाला आहे.
काय म्हणाला पाकिस्तानचा माजी कर्णधार?
पाकिस्तानी माध्यमांशी बोलताना सलमान बट म्हणाला, "जर लोकांना समजून घ्यायचे नसेल तर त्यांना समजावून सांगण्याचा काही उपयोग नाही. लाहोर स्टेडियममध्ये नवीन एलईडी दिवे आहेत आणि उच्च प्रतीचे आहेत. जेव्हा न्यूझीलंडचे खेळाडू १५० किमी वेगाने चेंडू फेकतात आणि त्यावर न्यूझीलंडचे खेळाडू चौकार-षटकार मारतात त्यावेळी दिव्यांचा विषय येत नाही. जेव्हा तुम्ही फलंदाजी किंवा गोलंदाजी करता तेव्हा वेगवान चेंडू दिसतो. तुम्ही समजून घेतलं पाहिजे की, ७० मीटर अंतरावर उभा असलेला खेळाडू झेल घेऊ शकला नाही, तर ती त्याची चूक आहे. कदाचित त्याचा पाय घसरला असेल आणि त्यामुळे त्याला दुखापत झाली असेल."
रचिन रवींद्र दुसरा सामना खेळला नाही!
रचिन रवींद्रची दुखापत इतकी गंभीर होती की त्याला चेंडू लागल्यानंतर त्याने लगेच मैदान सोडले. हा चेंडूत डोळ्याला लागू शकला असता. चेंडू रचिनच्या डोक्यावर लागताच रक्तस्त्राव सुरू झाला होता आणि त्याला टाके घालावे लागले. एवढेच नाही तर तो दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा दुसरा एकदिवसीय सामनाही खेळू शकला नाही. असे असूनही पाकिस्तानी माजी खेळाडूंकडून बेजबाबदार विधाने केली जात आहेत.
Web Title: Pakistan Salman Butt Controversial remark over Rachin Ravindra Missed Catch Injury Controversy ahead of Champions Troophy 2025
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.