पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला ( PCB) शुक्रवारी मोठा धक्का बसला. १८ वर्षांनंतर पाकिस्तान दौऱ्यावर आलेल्या न्यूझीलंड संघानं पहिला सामना खेळण्यापूर्वीच दौरा रद्द केला. आजपासून पाकिस्तान-न्यूझीलंड यांच्यातल्या वन डे मालिकेला सुरुवात होणार होती. पण, दोन्ही संघांचे खेळाडू मैदानावर आलेच नाही. दहशतवादी हल्ला होण्याची माहिती न्यूझीलंडच्या गुप्तचर विभागाला मिळाली होती आणि त्यानंतर हा दौरा रद्द केला गेला. न्यूझीलंडच्या या निर्णयावर पाकिस्तानी क्रिकेटपटूंसह त्यांचे पाठीराखे नाराज झाले. अनेकांनी क्रिकेट विश्वातला हा दुःखद दिवस असल्याचे मत व्यक्त केले.
- Cricket Buzz»
- बातम्या»
- पाकिस्तान सुरक्षित देश; न्यूझीलंडनं दौरा रद्द केल्यानंतर पाक क्रिकेटपटू खवळले, शोएब अख्तरसह अनेकांनी परखड मत मांडले
पाकिस्तान सुरक्षित देश; न्यूझीलंडनं दौरा रद्द केल्यानंतर पाक क्रिकेटपटू खवळले, शोएब अख्तरसह अनेकांनी परखड मत मांडले
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला ( PCB) शुक्रवारी मोठा धक्का बसला. १८ वर्षांनंतर पाकिस्तान दौऱ्यावर आलेल्या न्यूझीलंड संघानं पहिला सामना खेळण्यापूर्वीच दौरा रद्द केला.
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2021 17:02 IST