लाहोर : चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्याचे ध्येय समोर ठेवाच, त्याशिवाय टीम इंडियाला २३ फेब्रुवारीला दुबईत जाऊन हरवा, असे आवाहन करणारे पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी, 'भारताविरुद्ध जिंकणे हेच आमच्या संघापुढील खरे आव्हान आहे,' अशी कबुली शनिवारी दिली. दुबईतील सामन्यात पारंपरिक प्रतिस्पर्धी भारताला हरविण्यासाठी संपूर्ण देश संघाच्या मागे उभा आहे. विजेतेपदापेक्षा भारतावरील विजय आव्हानात्मक आहे, असे पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी म्हटले आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
नव्याने उभारण्यात आलेल्या गडाफी स्टेडियमचे उद्घाटन केल्यानंतर पंतप्रधान म्हणाले, 'आमचा संघ फार चांगला असून, खेळाडूंनी अलीकडे देदीप्यमान कामगिरी केली; पण त्यांच्यापुढील खरे आव्हान चॅम्पियन्स
ट्रॉफी जिंकणेच नाही तर दुबईतील सामन्यात भारताला हरविणे हेदेखील आहे.' पाकिस्तानच्या यजमानपदाखाली चॅम्पियन्स ट्रॉफी १९ फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. गतविजेता पाकिस्तानचा संघ घरच्या मैदानाचा फायदा उचलताना पुन्हा ट्रॉफी जिंकण्यासाठी उत्सुक आहे.
भारताने चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी त्यांचा संघ पाकिस्तानला पाठवण्यास नकार दिल्याने ही स्पर्धा हायब्रिड मॉडेलनुसार खेळवली जात आहे. त्यामुळे भारतीय संघाचे सर्व सामने दुबईत खेळवले जाणार आहेत आणि पाकिस्तानविरुद्धचा सामना २३ फेब्रुवारीला दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. भारत-पाक यांच्यात जर अंतिम सामना झाला तर हा सामना देखील दुबईत खेळविला जाईल.
पाकिस्तानने २०१७ मध्ये अंतिम फेरीत भारताला पराभूत केले होते. आयसीसी स्पर्धेत पाकिस्तानचा भारताविरुद्ध शेवटचा विजय २०२१ मध्ये दुबईमध्ये टी-२० विश्वचषषकात झाला होता. शरीफ म्हणाले, 'जवळपास २९ वर्षांनंतर आपण आयसीसी स्पर्धेचे आयोजन करत आहोत आणि ही पाकिस्तानसाठी एक मोठी संधी आहे. आपला संघ आगामी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये देशाला अभिमान वाटेल, अशी कामगिरी करेल, असा मला पूर्ण विश्वास आहे.' पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी लाहोर, कराची आणि रावळपिंडी येथील तीन स्टेडियमचे नूतनीकरण केले आहे.
वर्षांनंतर २९ आयसीसी स्पर्धा