पाकिस्तानी खेळाडूची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुन्हा एन्ट्री; ४ महिन्यांपूर्वी राजीनामा पण...

Imad Wasim News: पाकिस्तानी खेळाडू इमाद वसीमने मोठी घोषणा केली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2024 05:52 PM2024-03-23T17:52:47+5:302024-03-23T17:53:22+5:30

whatsapp join usJoin us
Pakistan player Imad Wasim has come out of retirement and is said to be available for the Twenty20 World Cup | पाकिस्तानी खेळाडूची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुन्हा एन्ट्री; ४ महिन्यांपूर्वी राजीनामा पण...

पाकिस्तानी खेळाडूची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुन्हा एन्ट्री; ४ महिन्यांपूर्वी राजीनामा पण...

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

पाकिस्तान क्रिकेट बोर्ड नाट्यमय घडामोडींमुळे नेहमीच चर्चेत असते. आता पुन्हा एकदा पीसीबी चर्चेच्या केंद्रस्थानी असून शेजाऱ्यांनी विश्वचषकाच्या दृष्टीने पावले टाकण्यास सुरुवात केली आहे. (Imad Wasim) नोव्हेंबर २०२३ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झालेला इमाद वसीम पुन्हा एकदा पाकिस्तानच्या आंतरराष्ट्रीय संघात खेळताना दिसणार आहे. पाकिस्तान सुपर लीगच्या नवव्या हंगामात शानदार कामगिरी केल्यानंतर वसीमचे संघातील वजन वाढले. (Imad Wasim Latest News) पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने ट्वेंटी-२० संघाची धुरा शाहीन शाह आफ्रिदीकडे दिली आहे. आगामी काळात जूनमध्ये अमेरिका आणि वेस्ट इंडिजच्या धरतीवर ट्वेंटी-२० विश्वचषकाचा थरार रंगणार आहे. (Imad Wasim On T20 World Cup 2024)  

पाकिस्तानी संघात मधल्या फळीत एकही विश्वासू खेळाडू नसल्याने अनेकदा संघाला फटका बसला आहे. त्यामुळे इमाद वसीमला संघात स्थान मिळण्याची दाट शक्यता आहे. माजी कर्णधार बाबर आझम आणि इमाद यांच्यात वैर असल्याचे बोलले जाते. मात्र, विश्वचषकाच्या दृष्टीने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने रणनीती आखण्यास सुरुवात केली असून इमाद वसीमशी चर्चा करून बोर्डाने त्याला आपला राजीनामा मागे घेण्यास सांगितले.

इमादची आता पलटी 

वसीमने याबाबत माहिती दिली असून त्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून म्हटले की, मला हे जाहीर करताना आनंद होत आहे की, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर मी माझ्या निवृत्तीच्या निर्णयावर पुनर्विचार केला. आयसीसी ट्वेंटी-२० विश्वचषक २०२४ पर्यंत होणाऱ्या ट्वेंटी-२० सामन्यांसाठी मी पाकिस्तानसाठी उपलब्ध असेन. माझ्यावर विश्वास दाखवल्याबद्दल बोर्डातील सर्व अधिकाऱ्यांचे आभार मानू इच्छितो. 

भारतात पार पडलेल्या वन डे विश्वचषकात शेजाऱ्यांनी निराशाजनक कामगिरी केली. अफगाणिस्तानसारख्या संघाकडून देखील पाकिस्तानला पराभवाचा सामना करावा लागला होता. यानंतर बाबर आझमने कर्णधारपदाचा राजीनामा दिला. मग पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने ट्वेंटी-२० संघाचा कर्णधार शाहीन आफ्रिदीला तर कसोटी संघाचे नेतृत्व शान मसूदकडे सोपवले. 

Web Title: Pakistan player Imad Wasim has come out of retirement and is said to be available for the Twenty20 World Cup

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.