Blessing Muzarbani, IPL vs PSL: पाकिस्तान सुपर लीगचा ११ वा हंगाम २६ मार्च रोजी सुरू होणार आहे. त्याआधीच पाकिस्तान क्रिकेटला मोठा धक्का बसला आहे. झिम्बाब्वेचा वेगवान गोलंदाज ब्लेसिंग मुझारबानीने पाकिस्तान सुपर लीग सोडून आयपीएलमध्ये खेळण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचा तीळपापड झाला असून ते मुझारबानीवर गंभीर कारवाई करण्याच्या तयारीत आहेत. मुस्तफिजूर रहमानने IPL मधून माघार घेतल्यानंतर KKRने मुझारबानीला संघात घेतले आहे.
पीसीबी मुजारबानीवर कारवाई करणार...
मुझारबानीला सुरुवातीला पीएसएल संघ इस्लामाबाद युनायटेडने शमार जोसेफच्या जागी करारबद्ध केले होते. सुरुवातीला तो PSL 2026 मध्ये तीन वेळा विजेत्या इस्लामाबाद युनायटेडकडून खेळणार होता. पण २०२६ च्या टी२० विश्वचषकात त्याच्या प्रभावी कामगिरीने परिस्थिती बदलली. मुझारबानीने सहा सामन्यांमध्ये १३ विकेट्स घेतल्या, ज्यामध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चार विकेट्सचा समावेश होता. यामुळे कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) ने त्याला आयपीएलसाठी करारबद्ध केले.
सलग दुसऱ्यांदा पाकिस्तानची नाचक्की
केकेआरने जानेवारीमध्ये बांगलादेशच्या मुस्तफिजूर रहमानला रिलीज केले आणि त्याच्या जागी कालच मुझारबानीला घेतले. मुझारबानीने पीएसएल करार सोडून आयपीएलचा पर्याय निवडला आहे, ज्यामुळे पीसीबी नाराज आहे. पाकिस्तानी मीडिया रिपोर्ट्सनुसार, पीसीबी मुझारबानीविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करेल. असे प्रकरण उघडकीस येण्याचे हे सलग दुसरे वर्ष आहे. गेल्या हंगामात कॉर्बिन बॉशने मुंबई इंडियन्समध्ये सामील होण्यासाठी पीएसएल सोडले होते, त्यानंतर पीएसएलने त्याच्यावर एका हंगामाची बंदी घातली होती. वृत्तानुसार, मुझारबानीला आता पीएसएलमध्ये खेळण्यासही एक वर्षाची बंदी घालण्यात येईल.
मुझाराबानीची प्रभावी कारकिर्द
ब्लेसिंग मुझारबानी हा झिम्बाब्वेच्या सर्वात यशस्वी खेळाडूंपैकी एक आहे. त्याने आतापर्यंत ८९ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत आणि १०६ विकेट्स घेतल्या आहेत. तो सलग दुसऱ्या हंगामात आयपीएलमध्येही खेळणार आहे. गेल्या हंगामात तो चॅम्पियन संघ आरसीबीचा भाग होता. पण त्याला पदार्पणाची संधी मिळाली नाही.
Web Summary : Blessing Muzarabani's IPL decision over PSL angered Pakistan Cricket Board. KKR signed him after Rahman's exit. PCB considers legal action, potentially imposing a one-year PSL ban, similar to a previous case. He previously played for RCB.
Web Summary : पीएसएल पर ब्लेसिंग मुज़राबानी के आईपीएल निर्णय से पाकिस्तान क्रिकेट बोर्ड नाराज़ है। रहमान के बाहर निकलने के बाद केकेआर ने उन्हें साइन किया। पीसीबी कानूनी कार्रवाई पर विचार कर रहा है, संभावित रूप से एक साल का पीएसएल प्रतिबंध लगा सकता है।