Join us
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तानचा सलामीवीर अडकला #MeToo प्रकरणात; तरुणीचे गंभीर आरोप

वर्ल्ड कप स्पर्धेतील निराशाजनक कामगिरीनंतर पाकिस्तानी संघातील खेळाडूंवर टीका होत आहे. त्यांच्यासमोरील अडचणी कमी होण्याचे नाव घेत नाही.

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2019 12:50 IST

Open in App

लाहोर : वर्ल्ड कप स्पर्धेतील निराशाजनक कामगिरीनंतर पाकिस्तानी संघातील खेळाडूंवर टीका होत आहे. त्यांच्यासमोरील अडचणी कमी होण्याचे नाव घेत नाही. पाकिस्तानचा सलामीवीर इमाम-उल-हक याच्यावर एका तरूणीनं गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे तोही #MeToo प्रकरणात अडकल्याची चर्चा सुरू झाली आहे. एका तरुणीनं ट्विटरवर इमामसोबत केलेल्या व्हॉट्सअप संभाषण पोस्ट केले आहे. त्यावरून त्याचे अनेक मुलींशी अफेअर असल्याचे स्पष्ट होत आहे.

इमाम हा पाकिस्तानचा माजी फलंदाज इंझमाम उल हकचा भाचा आहे. वर्ल्ड कप स्पर्धेत इमामला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. 8 सामन्यात त्यानं केवळ 305 धावा केल्या. त्यामुळे त्याच्यावर टीका होत होती आणि त्यात या प्रकरणामुळे त्याच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. 

टॅग्स :पाकिस्तानमीटू