वर्ल्ड कप स्पर्धेतील अपयशानंतर पाकिस्तान क्रिकेट मंडळाने ( PCB) मुख्य प्रशिक्षकाची उचलबांगडी केली. वर्ल्ड कप स्पर्धेनंतर पाक संघाला आलेली मरगळ झटकून टाकण्यासाठी PCBनं प्रशिक्षकपदी माजी कसोटीपटू मिसबाह-उल-हकची निवड केली. मिसबाहच्या या निवडीवर माजी कसोटीपटूंकडूनच विरोध होत आहे. मात्र, पाकिस्तान मंडळ मिसबाहच्या पाठिशी ठामपणे उभे आहेत. मिसबाहने हे पद मिळवण्यासाठी काही तरी वाटाघाटी केल्याचा आरोपही होत आहे आणि त्याचे उत्तर मिसबाहने दिले. त्याच्या उत्तरानंतर सोमर आलेल्या पगाराची रक्कम पाहून सर्वांना धक्का बसला.
भारतीय संघाने वर्ल्ड कप स्पर्धेनंतर रवी शास्त्री यांचीच मुख्य प्रशिक्षकपदी निवड केली. पण, त्यांना मिळणारे मानधन हे कॅप्टन विराट कोहलीपेक्षा कमी असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे सर्वांच्या भूवया उंचवल्या होत्या. पण, आता पाकिस्तानच्या प्रशिक्षक मिसबाहला मिळणाऱ्या पगाराचा आकडा समोर आला आहे.
जीओ न्यूजला मिळालेल्या माहितीनुसार मिसबाहला 2.8 मिलियन म्हणजेच 20 लाख 80 हजार रुपये इतका महिना पगार मिळतो. PCBनं मिसबाहसोबत तीन वर्षांचा करार केला आहे आणि त्याला प्रती वर्ष 3.4 कोटी मिळणार आहेत. शास्त्री यांना मिळणाऱ्या पगाराच्या तुलनेत हा आकडा फारच कमी आहे. शास्त्रींना वर्षाला 9.5 ते 10 कोटी रुपये इतका पगार मिळतो.