Join us

VIDEO : शाहिद आफ्रिदी बिहारी मुलाला म्हणाला, तुमचा भारत बाहेर, आता...? मिळालं उत्तर

लाईव्ह दरम्यान शाहिद आफ्रिदी म्हणतो, 'असे वाटते, की तू भारतातून बोलत आहेस. भारतातून कुठून बोलत आहेस?' यावर तो मुलगा म्हणतो, 'सर, मी बिहारचा आहे.' नंतर आफ्रिदी मुलाला विचारतो, तू कोणत्या संघाला सपोर्ट करतो. तुमचा भारत तर T20 वर्ल्डकपमधून बाहेर पडला आहे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2021 23:49 IST

Open in App

पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतो. आता, आफ्रिदीने इंस्टाग्राम लाईव्हवर चाहत्यांशी संवाद साधला आहे. या संवादादरम्यान एक भारतीय बिहारी मुलगा शाहीद आफ्रिदीसोबत लाइव्हमध्ये सामील झाला. यावेळी आफ्रिदीने त्याच्यासोबत मनमोकळ्या गप्पा मारल्या.

लाईव्ह दरम्यान शाहिद आफ्रिदी म्हणतो, 'असे वाटते, की तू भारतातून बोलत आहेस. भारतातून कुठून बोलत आहेस?' यावर तो मुलगा म्हणतो, 'सर, मी बिहारचा आहे.' नंतर आफ्रिदी मुलाला विचारतो, तू कोणत्या संघाला सपोर्ट करतो. तुमचा भारत तर T20 वर्ल्डकपमधून बाहेर पडला आहे?

यावर तो मुलगा म्हणतो, आम्ही तर आता पाकिस्तानला सपोर्ट करत आहोत. मुलाचे उत्तर ऐकूण शाहीद आफ्रिदी खूश होतो आणि म्हणतो, की 'पाकिस्तान टीमला पसंती देणारे लोक संपूर्ण जगातच आहेत.

या दरम्यान मुलगा आणि शाहीद आफ्रिदी यांनी बऱ्याच वेळ गप्पा मारल्या -शाहिद आफ्रिदी आणि मुलामध्ये एक गमतीशीर गोष्ट घडते. मुलगा आफ्रिदीला सांगतो, की 'मी रात्री अभ्यास करतो आणि दिवसा झोपतो.' यावर आफ्रिदी म्हणतो, भाऊ, आपण पूर्णपणे उलटे काम करत आहात. असेच सुरू राहिले तर, आपले जगच उलटे होईल. अल्लाहने रात्र झोपण्यासाठी आणि दिवस कामासाठी दिला आहे. यानंतर आफ्रिदीने मुलाला त्याच्या भविष्यासाठी शुभेच्छाही दिल्या. 

टॅग्स :शाहिद अफ्रिदीपाकिस्तानट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२१बिहार
Open in App