Join us

बिस्किट, लॉलीपॉपनंतर पाकिस्तानी संघ पुन्हा ट्रोल, सोशल मीडियावर विनोद मालिका

पाकिस्तान क्रिकेट संघाची कामगिरी चांगलीच उंचावली असली तरी त्यांच्या कामगिरीपेक्षा मालिकेसाठी तयार करण्यात आलेल्या चषकामुळे हा संघ जास्तच चर्चेत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2018 16:15 IST

Open in App

मुंबई :  पाकिस्तान क्रिकेट संघाची कामगिरी चांगलीच उंचावली असली तरी त्यांच्या कामगिरीपेक्षा मालिकेसाठी तयार करण्यात आलेल्या चषकामुळे हा संघ जास्तच चर्चेत आहे. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यातील मालिकेत बिस्किट आणि लॉलीपॉप आकाराच्या चषकामुळे पाकिस्तानी संघ ट्रोल झाला होता. त्यात शनिवारी आणखी भर पडली. पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यातील मालिकेसाठीच्या चषकाला 'ओए होए' असे नाव देण्यात आले आहे. त्यामुळे सोशल मीडियावर पुन्हा विनोद मालिका सुरू झाली आहे. 

पाकिस्तान क्रिकेट मंडळाने (पीसीबी) न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेच्या चषकाच्या अनावरणाचा फोटो पोस्ट केला. पाकिस्तानचा कर्णधार सर्फराज अहमद आणि न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सन यांनी चषकाचे अनावरण केले. या चषकावर 'ओए होए' असे लिहिले आहे. त्यावरून नेटीझन्सना खिल्ली उडवण्यासाठी आयतं कोलीत मिळालं. याआधी झालेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत बिस्किट ट्रॉफी होती. 

(आधी बिस्कीट अन् आता लॉलिपॉप... पाकिस्तान क्रिकेट संघाची विनोद मालिका)

टॅग्स :पाकिस्तानन्यूझीलंड