Pakistan Cricket Team Semi Final Scenario After Loss Against India Champions Trophy 2025 : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील २०१७ चा चॅम्पियन्स संघ पाकिस्तान आपल्या यजमानपदाखाली रंगलेल्या स्पर्धेतून बाहेर होण्याच्या मार्गावर आहे. दुबईच्या मैदानातील भारतीय संघाविरुद्धच्या पराभवानंतर यजमान पाकिस्तान संघाचा यंदाच्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील प्रवास जवळपास संपुष्टात आला आहे. क्रिकेटमध्ये काहीही होऊ शकते, याच आशेवर जर तरच्या समीकरणात पाक संघ अजून स्पर्धेत टिकून आहे. आता यजमान पाकिस्तानच्या नजरा या रावळपींडीच्या मैदानात रंगणाऱ्या न्यूझीलंड विरुद्ध बांगलादेश यांच्यातील लढतीवर असतील. एक नजर टाकुयात भारतीय संघाविरुद्धच्या पराभवानंतर स्पर्धेत टिकून राहण्यासाठी पाकिस्तानसाठी पाहुण्यांची मॅच किती महत्त्वाची झालीये त्यासंदर्भातील समीकरणावर
न्यूझीलंड-बांगलादेश यांच्यातील लढतीवर असतील पाकच्या नजरा
मोहम्मद रिझवानच्या नेतृत्वाखालील पाकिस्तानच्या संघाला यंदाच्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच्या सलामीच्या लढतीत न्यूझीलंडने पराभूत केले होते. आपल्याला पराभूत करणाऱ्या या संघाला आता बांगलादेशच्या संघानं पराभूत करावे, यासाठी पाकिस्तान ताफ्यातील खेळाडू आणि या संघाच्या चाहत्यांना दुवाँ करावी लागेल. जर न्यूझीलंडच्या संघाने बांगदेशला पराभूत केले तर पाकिस्तानचा स्पर्धेतील प्रवास आजच्या निकालानंतरच संपुष्टात येईल.
यजमान पाकिस्तान सेमीचा मार्ग खूपच 'मुश्किल', कसं आहे समीकरण?
न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यात बांगलादेशच्या संघानं बाजी मारली तर पाकिस्तानची स्पर्धेत टिकून राहण्याची आशा जिवंत राहिल. याचा अर्थ ते सेमी खेळतील, असे नाही. त्यानंतर पाकिस्तानला भारतीय संघानं न्यूझीलंडला पराभूत करण्याची वाट बघावी लागेल. दुसऱ्याच्या मॅचवर नजरा ठेवताना बांगलादेश विरुद्धच्या साखळी फेरीतील सामन्यात पाकला मोठ्या फरकाने विजय नोंदवावा लागेल. जर हे सर्व जुळून आलं तर त्यांच्यासाठी एक संधी निर्माण होऊ शकते. पण ते जुळं अशक्यच वाटते.
'अ' गटातून या दोन संघांना सेमीच तिकीट मिळणार हे जवळपास पक्के, पण...
'अ' गटातून पाकिस्तान संघ जवळपास बाहेर पडल्यात जमा आहे. दुसरीकडे बांगलादेशही त्यांच्या पंक्तीत जॉइन झाल्याचे दिसू शकते. या गटात भारत आणि न्यूझीलंड हे दोन संघ सेमीत एन्ट्री मारताना दिसू शकते. आता या दोन्ही संघात ग्रुपमध्ये टॉपर कोण ठरणार ते पाहण्याजोगे असेल. सध्याच्या घडीला भारतीय संघ दोन्ही सामन्यातील विजयासह अव्वलस्थानावर आहे. न्यूझीलंडच्या संघानं बांगलादेशला नमवल तर रविवारी २ मार्चला भारत-न्यूझीलंड यांच्यातील निकालानंतर ग्रुपमध्ये टॉपर कोण? ते चित्र स्पष्ट होईल.
Web Title: Pakistan Cricket Team Semi Final Scenario After Loss Against India Champions Trophy 2025 Ban vs Nz
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.