Join us
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तान क्रिकेट मंडळानं महिला खेळाडूंसाठी केलेलं ट्विट बनलं चर्चेचं कारण; नेटिझन्सनी चांगलेच धुतले!

पाकिस्तान क्रिकेट मंडळ ( PCB) त्यांच्या सोशल मीडियावरील पोस्टने नेहमी चर्चेत असतो.

By स्वदेश घाणेकर | Updated: October 9, 2020 17:54 IST

Open in App

पाकिस्तान क्रिकेट मंडळ ( PCB) त्यांच्या सोशल मीडियावरील पोस्टने नेहमी चर्चेत असतो. असंच एक नव ट्विट सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. महिला क्रिकेटपटू कुठे आहेत? असा सवाल त्यांना केला जात आहे. पाकिस्तान क्रिकेट मंडळानं पोस्ट केली की, आमच्या महिला क्रिकेटपटू स्थानिक स्पर्धांमध्ये सहभाग घेण्यासाठी कराचीला जात आहेत. त्यांनी हे लिहिलं त्यात काहीच चुकीचे नाही, परंतु त्यांनी क्रिकेटपटूंच्या जागी त्यांच्या बॅग्सचे फोटो पोस्ट केले आणि त्यावरून मीम्सचा पाऊस पडला.   नेटिझन्स सुसाट... 

टॅग्स :पाकिस्तानसोशल मीडिया