Join us

Pakistan Cricket, Afridi Suspended: पाकिस्तान क्रिकेटमध्ये भूकंप! भ्रष्टाचाराप्रकरणी आफ्रिदीचं निलंबन

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने केली कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2022 22:02 IST

Open in App

Pakistan Cricket, Afridi Suspended: पाकिस्तानी क्रिकेट संघाला नुकताच आशिया चषकाच्या फायनलमध्ये पराभव स्वीकारावा लागला. आता T20 World Cup साठी संघ निवडीपूर्वी पाकिस्तान क्रिकेटमध्ये मोठी घडामोड झाली. पाकिस्तानचा क्रिकेटपटू आफ्रिदीवर भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यानंतर त्याला क्रिकेट बोर्डाने निलंबित करून टाकले. पाकिस्तानी क्रिकेटमध्ये शाहिद आफ्रिदी किंवा शाहीन शाह आफ्रिदी हे दोघे सर्वाधिक चर्चेत असतात. पण या प्रकरणात असलेला हा आफ्रिदी म्हणजे, खैबर पख्तूनख्वाचा लेफ्ट आर्म स्पिनर आसिफ आफ्रिदी (Asif Afridi) आहे. पाकिस्तानचा देशांतर्गत क्रिकेटपटू असलेल्या असिफ आफ्रिदीवर ही कारवाई करण्यात आली आहे.

आफ्रिदीवर भ्रष्टाचाराचे आरोप

असिफ आफ्रिदीला भ्रष्टाचारप्रकरणी १२ सप्टेंबर रोजी निलंबित करण्यात आले होते. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या लाचलुचपत प्रतिबंधक नियमावलीच्या कलम ४.७.१ अन्वये त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने मंगळवारी जारी केलेल्या निवेदनात ही माहिती देण्यात आली आहे. PCB च्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने या प्रकरणाची सखोल चौकशी करत आहे. या संदर्भात काही गोष्टींचा नीट खुलासा जोपर्यंत होत नाही, आणि आफ्रिदीला 'क्लीन चिट' मिळत नाही, तोपर्यंत त्याला कोणत्याही क्रिकेटशी संबंधित कार्यक्रम, स्पर्धांमध्ये सहभागी होता येणार नाही.

१४ दिवसांत उत्तर द्यावे लागणार

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने सांगितले की, आफ्रिदीला नोटीस बजावण्यात आली आहे. क्रिकेटशी संबंधित २ नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्याला कलम २.४ अंतर्गत ही नोटीस पाठवण्यात आली आहे. त्यावर त्याला १४ दिवसांच्या आत उत्तर द्यायचे आहे. PCB ने म्हटले आहे की, तपास सुरू असल्याने याबाबत अधिक माहिती देणे उचित ठरणार नाही.

टॅग्स :पाकिस्तानऑफ द फिल्डभ्रष्टाचार
Open in App