Join us  

PSL 2023: PCBचे BCCIच्या पावलावर पाऊल; आता पाकिस्तानातही सुरू होणार 'महिला लीग'

pakistan cricket board chairman: भारतात IPLच्या धरतीवर महिला प्रीमियर लीगच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 08, 2023 5:14 PM

Open in App

Women PSL 2023 । नवी दिल्ली : भारतात आयपीएलच्या धरतीवर महिला प्रीमियर लीगच्या स्पर्धेचे (WPL) आयोजन करण्यात आले आहे. महिला प्रीमियर लीगमध्ये एकूण 5 संघ आहेत. महिला क्रिकेटला प्राधान्य देणाऱ्या या स्पर्धेत देश विदेशाताली अनेक खेळाडू सहभागी झाले आहेत. आताच्या घडीला पाकिस्तानातपाकिस्तान सुपर लीगचा (PSL) थरार रंगला आहे. महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर शेजारी देशात महिला पीएसएल म्हणजेच महिला लीग सुरू करण्यात आली आहे. आज या स्पर्धेतील पहिला सामना खेळवला जात आहे. 

दरम्यान, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने पीएसएल महिला लीग सुरू केली आहे. आताच्या घडीला या लीगमध्ये फक्त दोनच संघ सहभागी होत आहेत. या लीगमध्ये एकूण 3 सामने खेळवले जाणार आहेत. पहिला सामना 8 मार्चला, दुसरा सामना 9 मार्चला आणि तिसरा सामना 10 मार्चला होणार आहे.

अशातच पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष नजम सेठी यांनी याबाबत माहिती देताना एक मोठी घोषणा केली आहे. या वर्षीच्या अखेरीस पाकिस्तानात महिला प्रीमियर लीगचे आयोजन केले जाणार असल्याचे सेठी यांनी स्पष्ट केले. "महिला लीगची तयारी सुरू असून, आम्ही लवकरच याबाबत अधिकृतपणे घोषणा करू. आगामी सप्टेंबर महिन्यात PSL महिला लीगचे आयोजन करण्याची योजना आहे. पाकिस्तान सुपर लीगमधील फ्रँचायझी महिला लीगमधील संघ खरेदी करू शकतात", अशी माहिती पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष नजम सेठी यांनी दिली. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

 

टॅग्स :महिला प्रीमिअर लीगपाकिस्तानबीसीसीआयमहिला टी-२० क्रिकेटमहिला
Open in App