Join us

फिटनेस्ट टेस्टमध्ये अपयशी ठरल्यास क्रिकेटपटूंचा पगार कापला जाणार

राष्ट्रीय संघात स्थान मिळवण्यासाठी आता सर्वच संघ खेळाडूंच्या तंदुरुस्ती चाचणीकडे भर देताना दिसत आहेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2020 14:58 IST

Open in App

भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं ( बीसीसीआय) Yo-Yo टेस्ट अमलात आणल्यानंतर सर्वच संघांमध्ये फिटनेसचे महत्त्व वाढलेले पाहायला मिळत आहे. राष्ट्रीय संघात स्थान मिळवण्यासाठी आता सर्वच संघ खेळाडूंच्या तंदुरुस्ती चाचणीकडे भर देताना दिसत आहेत आणि तंदुरुस्ती सिद्ध करण्यासाठी खेळाडूंना उतीर्ण गुण ठरवण्यात आले आहेत. अनुतीर्ण खेळाडूंना संघात स्थान मिळणे हे कठीणच होते, पण आता एका राष्ट्रीय क्रिकेट मंडळानं काढलेल्या फतव्यानुसार खेळाडू तंदुरुस्ती चाचणीत सातत्यानं अपयशी ठरल्यास त्याच्या पगारात कपात होणार आहे. हा फतवा कोणी व का काढला ते जाणून घेऊया...

पाकिस्तान क्रिकेट मंडळानं ( पीसीबी) हा फतवा काढला आहे. त्यांनी पाकिस्तान संघातील प्रत्येक खेळाडूला 6 व 7 जानेवारीला राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत तंदुरुस्ती चाचणीसाठी हजर राहण्यास सांगितले आहे. ''सेंट्रल करार असलेल्या सर्व खेळाडूंनी दोन दिवसांच्या तंदुरुस्ती चाचणीसाठी हजर रहावे. वाहब रियाझ, मोहम्मद आमीर आणि शाबाद खान हे बांगलादेश प्रीमिअर लीगमध्ये खेळत असल्यामुळे त्यांची चाचणी 20 व 21 जानेवारीला होईल,'' असे पीसीबीनं त्यांच्या निवेदनात म्हटले आहे.

पीसीबीनं सांगितले आहे की, खेळाडू तंदुरुस्ती सिद्ध करण्यात अपयशी ठरल्यास त्यांना दंड भरावा लागेल आणि तो तंदुरुस्ती सिद्ध करेपर्यंत कायम असेल. शिवाय अयपशी खेळाडूंना करारही गमवावा लागू शकतो आणि त्याचा परिणाम त्यांच्या पगारावरही होईल. पीसीबीच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे संचालक जाकिर खान यांनी सांगितले की,''खेळाडूंच्या तंदुरुस्तीवर आम्ही लक्ष ठेवून आहोत. कोणत्याही खेळात तंदुरुस्ती महत्त्वाची असतेच.''

सेंट्रल करारात असलेले खेळाडूअ गट - बाबर आझम, सर्फराज अहमद, यासीर शाहब गट - असाद शफिक, अझर अली, हॅरीस सोहैल, इमाम-उल-हक, मोहम्मद अब्बास, शाबाद खान, शाहीन शाह आफ्रिदीक गट - अबीद अली, हसन आली, फाखर जमान, इमाद वासीम, मोहम्मद आमीर, मोहम्मद रिझवान, शान मसूद, उस्मान शिनवारी, वाहब रियाज 

टॅग्स :पाकिस्तान