Join us

पाकिस्तानी गोलंदाज 'रन'मशिन विराटला शतक करू देणार नाहीत; प्रशिक्षकांची 'बोलबच्चन'गिरी

भारताची 'रन'मशिन विराट कोहलीला पाकिस्तानमध्ये सहजासजी शतक करता येणार नसल्याचे वक्तव्य पाकिस्तानी कोचने केलं आहे

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2018 13:49 IST

Open in App

नवी दिल्ली - भारताची 'रन'मशिन विराट कोहलीला पाकिस्तानमध्ये सहजासजी शतक करता येणार नसल्याचे वक्तव्य पाकिस्तानी कोच मिकी आर्थर यांनी केलं आहे. जागतिक क्रिकेटमध्ये विराट कोहलीच्या नावावर सध्या 54 शतके आहेत. त्यामधील 33 वन-डेमध्ये त्यानं शकते झळकावली आहेत. सध्याच दक्षिण आफ्रिकेविधात सुरु असलेल्या वन-डे मालिकेत विराटनं विक्रमी 33 वे शतक झळकावलं. वन-डेमध्ये शतकं झळकावण्यात विराट दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर प्रथम क्रमांकावर सचिन तेंडुलकर आहे. सचिनच्या नावावर 49 शतके आहेत. 

पाकिस्तान क्रिकेटचे मुख्य कोच मिकी आर्थर म्हणाले की,  भारतीय कर्णधार विराट कोहलीची फलंदाजी उत्कृष्ट आहे. सध्या जागतिक क्रिकेटमध्ये त्याच्या तोडीचा फलंदाज नाही. पण पाकिस्तानी गोलंदाज त्याला फलंदाजी करताना अडचणीत आणू शकतात. विराटला सहजासहजी शतक करु देणार नाही. विराट सध्याचा सर्वोत्तम फंलदाज आहे. पण आमचा संघ त्याला अडचणी आणू शकतो. प्रत्येक संघाविरोधात विराट कोहलीचे रेकॉर्ड चांगले आहे. 

मिकी आर्थर यांनी विराट कोहलीच्या फलंदाजीचे कौतुक केलं ते म्हणाले की, विराट कोहलीच्या फलंदाजीचा मी चाहता आहे.  त्याची फलंदाजीची शैली उत्कृष्ट आहे. सध्या तो जगातील सर्वोतम फलंदाजापैकी एक आहे. पाकिस्तान संघाचा नुकताच न्यूझीलंड दौरा संपला आहे. त्यानंतर मिकी ऑर्थर सध्या ऑस्ट्रेलियामध्ये सुट्टीवर आहेत. त्यांना उम्मीद आहे की भारतीय संघ लवकरच पाकिस्तान दौऱ्यावर येईल. 

2009 मध्ये श्रीलंका संघ पाकिस्तान दौऱ्यावर गेला असता त्यांच्यावर दहशतवादी हल्ला झाला होता. त्यानंतर कोणताही संघ अजूनपर्यंत पाकिस्तान दौऱ्यावर गेलेला नाही. सध्या भारत आणि पाकिस्तान फक्त आयसीसीच्या सामन्यात एकमेंकाबरोबर खेळतात. भारतानं शेवटचा पाकिस्तानचा दौरा 2005-06मध्ये केला होता. त्यावेळी दोन्ही संघामध्ये तीन कसोटी आणि पाच वन-डे सामन्याची मालिका झाली होती. यामध्ये भारत कसोटी मालिका 1-0ने हरला होता. तर वन-डेमध्ये पाकिस्तानला 4-1ने पराभव स्विकारावा लागला होता. 

टॅग्स :विराट कोहलीपाकिस्तानसचिन तेंडूलकर