पाकिस्तानी क्रिकेट संघाचा कर्णधार बाबर आझम ( Babar Azam) हा पुढील वर्षी लग्नबंधनात अडकणार आहे. आश्चर्याची बाब म्हणजे तो त्याच्या चुलत बहिणीसोबतच लग्नबंधनात अडकला आहे. पाकिस्तानमधील न्यूझ चॅनल यांनी जिओ न्यूजचा हवाला देताना ही बातमी दिली आहे. कर्णधार बाबर आणि चुलत बहीण यांच्या कुटुंबीयांमध्ये लग्नाच्या बाबतीत सहमती झाली आहे. पुढील वर्षी हे लग्न होणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार बाबर त्याच्या काकांच्या मुलीशी लग्न करणार आहे.
बाबर आझमवर लैंगिक शोषणाचे आरोप करण्यात आले आहेत. एका महिलेनं बाबरवर गंभीर आरोप केले होते. बाबरपासून आपल्याला दिवस गेले होते आणि त्यानं धमकी देत गर्भपात करण्यास भाग पाडल्याचा आरोपही त्या महिलेनं केला होता. महिलेनं सांगितलं की,''बाबरची क्रिकेट कारकीर्द सुरू झाली नव्हती तेव्हा त्यानं मला प्रपोज केलं होतं आणि मीही त्याच्या प्रेमाचा स्वीकार केला होता. त्यानं १० वर्ष माझं लैंगिक शोषण केलं. त्याच्याकडून मी प्रेग्नेंटही झाली होती, पण त्यानं जबरदस्तीनं गर्भपात करून घेतलं. २०१७साली त्यानं त्याचा नंबरही बदलला आणि तरीही तीन वर्ष त्यानं संबंध ठेवले. २०२०मध्ये त्यानं अचानक लग्नास नकार दिला.''
बाबरनं ३३ कसोटीत ४२.५३च्या सरासरीनं २१६९ धावा केल्या आहेत. ८० वन डे सामन्यांत ५६.८४च्या सरासरीनं ३८०८ धावा आणि ५४ ट्वेंटी-२०त २०३५ धावा केल्या आहेत. पाकिस्तानचा खेळाडू अझर अली यानं बाबरला लवकर लग्न कर असा सल्ला दिला होता आणि आता ते ट्विट व्हायरल होत आहे.