Join us

Hasan Ali : अम्पायनरने नॉट आऊट देताच पाकिस्तानी गोलंदाज हसन अली अंगावर धावला अन्..., Video 

पाकिस्तानचा संघ दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहे. त्याआधी पाकिस्तानचे खेळाडू रावळपिंडी येथे आंतरसंघ सराव करत आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2022 17:20 IST

Open in App

पाकिस्तानचा संघ दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहे. त्याआधी पाकिस्तानचे खेळाडू रावळपिंडी येथे आंतरसंघ सराव करत आहेत. पण, या सराव सामन्यात पाकिस्तानी गोलंदाज हसन अली याची एक कृती सर्वांच्या चर्चेची विषय ठरली आहे. हसन अलीने केलेल्या LBW च्या अपीलवर अम्पायरने नाबाद निर्णय दिला.  हसन अलीने टाकलेला चेंडू फलंदाज सलमान अली आघा याच्या पॅडवर आदळला, परंतु अम्पायरला तो बाद असल्याचे नाही वाटले.  

पण, अलीने लगेच अम्पायरकडे धाव घेतली आणि त्याचा बोट पकडून बाद असल्याचा निर्णय देण्यासाठी तो प्रयत्न करताना दिसला. त्याच्या या कृतीने मैदानावर एकच हश्शा पिकल्या.... तो अम्पायरला आऊट दे अशी विनंती करत होता. 

पाकिस्तानच्या श्रीलंका दौऱ्याची सुरुवात 16 जुलैपासून होणार आहे. या दौऱ्यासाठी निवडलेल्या संघात यासीर शाहचे पुनरागमन झाले आहे. बाबर आजमच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या पाकिस्तानी संघाने 36 वर्षीय यासीरला संधी दिली आहे. त्याने 11 महिन्यांपूर्वी वेस्ट इंडिजविरुद्ध शेवटची कसोटी खेळली होती, परंतु त्यानंतर फिटनेस चाचणीत तो अपयशी ठरला होता. त्यामुळे त्याला बांगलादेश व ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेला मुकावे लागले होते. 

2014 साली यासीरने कसोटीत पदार्पण केले आणि त्यानंतर 33 कसोटीत त्यांने सर्वात जलद 200 विकेट्स घेतल्या. सध्या त्याच्या नावावर 46 कसोटीत 235 विकेट्स आहेत. 2015च्या श्रीलंका दौऱ्यावर यासीरीने 24 विकेट्स घेतल्या होत्या आणि पाकिस्तानने ही मालिका 2-1 ने जिंकली होती. पाकिस्तान-श्रीलंका पहिली कसोटी 16 ते 20 व दुसरी कसोटी 24ते 28 जुलैला होणार आहे. 

टॅग्स :पाकिस्तानश्रीलंका
Open in App