Join us

ICC World Cup 2019 : पाकिस्तानचा विजयी निरोप; बांगलादेशवर 94 धावांनी मात 

वर्ल्ड कप स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलेल्या पाकिस्तान संघाने विजयी निरोप घेतला.

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2019 23:32 IST

Open in App

लॉर्ड्स, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : वर्ल्ड कप स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलेल्या पाकिस्तान संघाने विजयी निरोप घेतला. पाकिस्तानने अखेरच्या साखळी सामन्यात बांगलादेशवर ९४ धावांनी विजय मिळवला. शाहिन आफ्रिदीने ३५ धावांत ६ विकेट घेतल्या. वर्ल्ड कप स्पर्धेत एकाच सामन्यात पाच विकेट घेणारा तो युवा गोलंदाज ठरला. पाकिस्तानने विजयासाठी ठेवलेल्या ३१६ धावांचा पाठलाग करताना बांगलादेशचा संघ २२१ धावांत तंबूत परतला. 

फाखर  जमान ( 13) स्वस्तात माघारी परतल्यानंतर इमाम उल हक व बाबर आझम यांनी 157 धावांची भागीदारी करून पाकिस्तानला मोठ्या धावसंख्येच्या दिशेने वाटचाल करून दिली. बाबरने अर्धशतकी खेळी करून नवा विक्रमाला गवसणी घातली. वर्ल्ड कप स्पर्धेच्या एका मोसमात सर्वाधिक धावा करणाऱ्या पाकिस्तानी फलंदाजाचा विक्रम त्याने नावावर केला. जावेद मियादाँद यांचा 1992च्या वर्ल्ड कपमधील 437 धावांचा विक्रम त्याने मोडला. मात्र, त्याला शतकानं हुलकावणी दिली. त्यानं 98 चेंडूंत 96 धावा केल्या. यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये त्याने 474 धावा केल्या आहेत. इमामने शतकी खेळी केली. पण, पाकिस्तानच्या धावांचा वेग हा अपेक्षेपेक्षा कमी होता. मधल्या व तळाच्या फलंदाजांनी नांगी टाकल्यानं पाकिस्तानला 50 षटकांत 9 बाद 315 धावा करता आल्या. 

लक्ष्याचा पाठलाग करताना बांगलादेशचा संपूर्ण संघ ४४.१ षटकांत २२१ धावांत तंबूत परतला. शाकिब अल हसन (६४) वगळता बांगलादेशच्या अन्य फलंदाजांना अपयश आले. वर्ल्ड कप स्पर्धेत सलग ८ सामन्यांत ४०+ धावा करणारा तो पहिला फलंदाज ठरला.