Azhar Ali, PAK vs ENG Video: पाकिस्तानचा अझर अली शून्यावर बाद, तरीही इंग्लंडच्या खेळाडूंनी केला टाळ्यांचा कडकडाट

असा अजब प्रसंग क्रिकेटमध्ये क्वचितच घडला असेल

By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2022 02:56 PM2022-12-19T14:56:20+5:302022-12-19T14:58:01+5:30

whatsapp join usJoin us
Pakistan batsman Azhar ali got out on duck still England players clapped congratulated him Video goes viral after his last test inning | Azhar Ali, PAK vs ENG Video: पाकिस्तानचा अझर अली शून्यावर बाद, तरीही इंग्लंडच्या खेळाडूंनी केला टाळ्यांचा कडकडाट

Azhar Ali, PAK vs ENG Video: पाकिस्तानचा अझर अली शून्यावर बाद, तरीही इंग्लंडच्या खेळाडूंनी केला टाळ्यांचा कडकडाट

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Azhar Ali, PAK vs ENG Video: क्रिकेट हा अनिश्चिततांचा खेळ आहे, हे साऱ्यांनाच माहिती आहे. क्रिकेटच्या मैदानात कधी काय घडेल याची कल्पना करणं कठीणच आहे. कधी हातातोंडाशी आलेला सामना प्रतिस्पर्धी संघ खेचून घेतो, तर कधी खिलाडीवृत्तीचं उत्तम दर्शन क्रिकेटच्या मैदानात पाहायला मिळतं. असाच एक प्रसंग नुकताच Gentleman's Game म्हटल्या जाणाऱ्या क्रिकेटमध्ये घडला. एखादा फलंदाज तुफान खेळी करून साऱ्यांची मनं जिंकतो त्यावेळी प्रतिस्पर्धी संघही त्याचे अभिनंदन करतानाचे अनेक प्रसंग क्रिकेटच्या मैदानात दिसतात. पण आज इंग्लंड-पाकिस्तान कसोटीत पाकिस्तानचा अझर अली शून्यावर बाद झाला तरीही त्याच्यासाठी बेन स्टोक्सच्या (Ben Stokes) इंग्लंड संघातील खेळाडूंनी उभं राहून टाळ्या वाजवल्याची अजब घटना घडली.

पाकिस्तानला अनेक कसोटी सामने जिंकून देणाऱ्या अझर अलीची कसोटी कारकीर्द अपयशाने संपुष्टात आली. पाकिस्तानी फलंदाजाला शेवटच्या कसोटी डावात खातेही उघडता आले नाही. कराची कसोटीच्या दुसऱ्या डावात अझर अली अवघे ४ चेंडूच खेळू शकला. डावखुरा फिरकी गोलंदाज जॅक लीचने अझहर अलीला उत्कृष्ट गोलंदाजी करत बाद केले. या विकेटसह अझर अलीची आंतरराष्ट्रीय कारकीर्द संपुष्टात आली. आणि त्यानंतर तो खूप भावनिक झाल्याचे दिसले.

अझर अलीची शेवटची इनिंग पाहण्यासाठी त्याचे कुटुंबीय आले होते. त्याची पत्नी आणि दोन मुले स्टेडियममध्ये उपस्थित होती. दुसरीकडे अझर मैदानात आल्यावर इंग्लंडच्या खेळाडूंनी त्याचे अतिशय अदबीने स्वागत केले. अझर अलीकडून शेवटच्या डावात चांगली कामगिरी अपेक्षित होती, मात्र तसे झाले नाही. अझहर अली बाद होताच इंग्लंडच्या संघाने त्याच्याशी हस्तांदोलन केले आणि टाळ्यांच्या कडकडाटात त्याला सीमारेषेपर्यंत निरोप दिला. पाकिस्तानी संघाने बॅट उंचावून त्याला 'गार्ड ऑफ ऑनर' दिला.

साहजिकच शेवटचा डाव हा कोणत्याही क्रिकेटपटूसाठी भावनिक क्षण असतो आणि अझर अलीसोबतही असेच काहीसे घडले. अझहर अली परतत असताना त्याच्या डोळ्यात पाणी दिसत होते. अझर अलीला शेवटच्या कसोटी डावात खाते उघडता आले नसले, तरी या खेळाडूची कसोटी कारकिर्द अप्रतिम ठरली. त्याने ९७ कसोटी सामन्यात ७,१४२ धावा केल्या आणि त्याची फलंदाजीची सरासरी ४२.२६ होती. अझर अलीने १९ कसोटी शतके झळकावली आणि यामध्ये २ द्विशतके आणि एक त्रिशतकही समाविष्ट आहे. हा त्याचा शेवटचा सामना असेल, असे त्याने आधीच जाहीर केले होते.

Web Title: Pakistan batsman Azhar ali got out on duck still England players clapped congratulated him Video goes viral after his last test inning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.