Join us  

"मी १०० वेळा सांगून झालंय..."; रवी शास्त्रीच्या प्रश्नावर पाकिस्तानच्या बाबर आझमचं मजेशीर उत्तर

पाकिस्तानच्या कर्णधाराने असं उत्तर का दिलं? नक्की काय होता प्रश्न? ... वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 05, 2023 2:11 PM

Open in App

Babar Azam, ODI World Cup 2023: भारतात आजपासून वन डे विश्वचषकाचा थरार रंगत आहे. यासाठी देशभरातील संघ भारतात दाखल झाले आहेत. बुधवारी या स्पर्धेच्या पूर्वसंध्येला 'कॅप्टन्स डे'च्या माध्यमातून सर्व संघाच्या कर्णधारांनी आपापली रणनिती आणि मतं मांडली. खरं तर पाकिस्तानी संघ सात वर्षांनंतर भारतात आला. बाबर आझमच्या संघाने प्रथम लाहोर ते दुबई असा प्रवास केला. दुबईहून पाकिस्तान क्रिकेट संघ हैदराबाद विमानतळावर दाखल झाला. शेजाऱ्यांचे हैदराबाद विमानतळावर धुमधडाक्यात स्वागत करण्यात आले. याबद्दल बोलताना कर्णधार बाबर आझमने भारतीयांचे आभार मानले. मात्र एका प्रश्नावर बाबर आझमने रवी शास्त्रींना दिलेले उत्तर चांगलेच चर्चेत आहे.

रवी शास्त्री प्रत्येक कर्णधाराशी संवाद साधत होता. त्यावेळी त्याने बाबर आझमला भारतातील हैदराबादी बिर्याणी बाबत विचारले. "बाबर, बिर्याणी कशी होती?," असा सवाल रवी शास्त्रीने विचारला. त्यावर उत्तर देताना बाबर म्हणाला, "मी १०० वेळा सांगून झालंय की बिर्याणी छान होती. मी ऐकून होतो की हैदराबादी बिर्याणी छान असते. आम्ही यावेळी ती खाल्ली आणि आम्हाला ती आवडली."

दरम्यान, बाबर भारताने केलेल्या आदरातिथ्याबाबतही भरभरून बोलला. "भारतात ज्या पद्धतीने आमचं स्वागत करण्यात आलं ते अप्रतिम होतं. भारतात आदरातिथ्य खूप उत्कृष्ट आहे, आम्हाला इतकी अपेक्षा देखील नव्हती. आम्हाला हे आमचं घर असल्यासारखंच वाटत होतं," असे बाबर म्हणाला. तसेच, आमची गोलंदाजी ही संघाची मजबूत बाजू असल्याने आम्ही यंदाच्या विश्वचषकात दणदणीत यश मिळवू असा विश्वास पाकिस्तानी कर्णधार बाबर आझमने व्यक्त केला.

टॅग्स :वन डे वर्ल्ड कपरवी शास्त्रीबाबर आजमपाकिस्तान