Join us  

४२व्या वर्षी तिसरं लग्न करणाऱ्या शोएब मलिकचा क्रिकेटच्या मैदानावर मोठा पराक्रम, पहिला आशियाई

पाकिस्तानचा माजी कर्णधार शोएब मलिक ( Shoaib Malik) शनिवारी चर्चेत आला तो त्याच्या तिसऱ्या लग्नामुळे...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2024 5:49 PM

Open in App

पाकिस्तानचा माजी कर्णधार शोएब मलिक ( Shoaib Malik) शनिवारी चर्चेत आला तो त्याच्या तिसऱ्या लग्नामुळे... ४२ वर्षीय शोएबने पाकिस्तानी अभिनेत्री अभिनेत्री साना जावेद ( Sana Javed) हिच्यासोबत लग्न केले. भारताची टेनिसपटू सानिया मिर्झा हिच्यासोबत १२ वर्षांचा संसार मोडून शोएबने हे पाऊल उचलल्याने क्रीडा प्रेमींना धक्का बसला. शोएबचे हे तिसरे लग्न आहे, सानियापूर्वी त्याने हैदराबादच्या आयेशासोबत २००२ मध्ये लग्न केले होते. या चर्चा सुरू असताना शोएबने क्रिकेटचे मैदान गाजवले आणि ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये इतिहास घडवला.

सानियापूर्वी एका भारतीय मुलीसोबत Shoaib Malik ने थाटलेला संसार; कोण आहे आयेशा?

ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये १३ हजार धावांचा टप्पा ओलांडणारा तो जगातील दुसरा आणि पहिला आशियाई फलंदाज ठरला. बांगलादेश प्रीमिअऱ लीगमध्ये फॉर्च्युन बरीशाल विरुद्ध रंगपूर रायडर्स या लढतीत शोएबने ही ऐतिहासिक कामगिरी केली. बरीशाल संघाकडून खेळताना १३५ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना शोएबने १७ धावांची नाबाद खेळी केली आणि या विक्रमाला गवसणी घातली.  

ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारे फलंदाज 

  • ख्रिस गेल - ४६३ सामने, १४,५६२ धावा
  • शोएब मलिक - ५२६ सामने, १३,०१० धावा
  • किरॉन पोलार्ड - ६४१ सामने, १२,४५४ धावा
  • विराट कोहली - ३५९ सामने, ११,९९४ धावा 
  • अॅलेक्स हेल्स - ४२७ सामने, ११,८०७ धावा

 

आशियाई फलंदाजांमध्ये ट्वेंटी-२० त सर्वाधिक धावा करण्याचा पराक्रम करून शोएबच्या नावावर या फॉरमॅटमध्ये एकही शतक नाही. त्यानं आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२०त १२४ सामन्यांत ३०च्या सरासरीने २४३५ धावा केल्या आहेत. २००९च्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप विजेत्या संघाचा तो सदस्य होता आणि २० नोव्हेंबर २०२१ पासून तो पाकिस्तानकडून खेळलेला नाही.   

टॅग्स :शोएब मलिकटी-20 क्रिकेटख्रिस गेल