Join us  

PAK vs ZIM : झिम्बाब्वेनं सुपर ओव्हरमध्ये पाकिस्तानला नमवलं; बाबर आझमचं शतक व्यर्थ

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या ( ICC) क्रमवारीत १४व्या स्थानावर असलेल्या झिम्बाब्वेनं ( Zimbabwe) तिसऱ्या वन डे सामन्यात पाकिस्तान ( Pakistan) संघावर सुपर ओव्हरमध्ये विजय मिळवला.

By स्वदेश घाणेकर | Published: November 03, 2020 8:49 PM

Open in App

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या ( ICC) क्रमवारीत १४व्या स्थानावर असलेल्या झिम्बाब्वेनं ( Zimbabwe) तिसऱ्या वन डे सामन्यात पाकिस्तान ( Pakistan) संघावर सुपर ओव्हरमध्ये विजय मिळवला. तिसऱ्या वन डे सामन्यात प्रथम फलंदाजी करताना झिम्बाब्वेनं ६ बाद २७८ धावा केल्या. प्रत्युत्तरात कर्णधार बाबर आझमच्या शतकाच्या जोरावर पाकिस्ताननं विजयाच्या दिशेनं कूच केली, परंतु अखेरच्या षटकात विजयासाठीच्या १३ धावा त्यांना करण्यात अपयश आलं. झिम्बाब्वेनं सुपर ओव्हरमध्ये हा सामना जिंकून क्रिकेट वर्ल्ड कप सुपर लीगमध्ये पहिल्या गुणाची कमाई केली. पाकिस्ताननं तीन सामन्यांची मालिका २-१ अशी जिंकली.

प्रथम फलंदाजी करताना झिम्बाब्वेचे ३ फलंदाज २२ धावांवर माघारी परतले होते. ब्रेंडन टेलर ( ५६) आणि सीन विलियम्स ( ११८*) यांच्या फटकेबाजीनं झिम्बाब्वेचा डाव सावरला. सिकंदर रझा आणि वेस्ली मॅधेव्हेर यांनी अखेरच्या षटकांत फटकेबाजी करताना अनुक्रमे ४५ व ३३ धावा करून संघाला ६ बाद २७८ धावांपर्यंत मजल मारून दिली. पाकिस्तानच्या मोहम्मद हस्नैननं पाच विकेट्स घेतल्या.

प्रत्युत्तरात पाकिस्तानचे दोन्ही सलामीवीर ६ धावांवर बाद झाले. पाकच्या मधल्या फळीतील फलंदाजही मोठी खेळी करू शकले नाही. कर्णधार आझम एकाबाजूनं खिंड लढवत होता. त्यानं १२५ धावा चोपल्या. ४९व्या षटकात त्याची विकेट गेली आणि पाकिस्तानला १३ धावा करता आल्या नाही. झिम्बाब्वेच्या ब्लेसिंग मुझाराबानीनं पाच विकेट्स घेतल्या.

सुपर ओव्हरमध्ये पाकिस्तान २ धावाच करू शकले आणि झिम्बाब्वेनं हे लक्ष्य सहज पार केले. 

टॅग्स :झिम्बाब्वेआयसीसीपाकिस्तान