Join us

मेरे मियाँ कहाँ हैं?; सर्फराज अहमदच्या पत्नीनं सोशल मीडियावरून पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला विचारला सवाल 

पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सर्फराज अहमद नेहमीच विचित्र कारणांमुळे चर्चेत असतो.

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2021 17:34 IST

Open in App

पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सर्फराज अहमद नेहमीच विचित्र कारणांमुळे चर्चेत असतो. क्रिकेटच्या मैदानावरील कामगिरी कमी अन् अन्य कारनाम्यामुळे त्याची चर्चा असते. त्यात आणखी एका प्रकरणाची नोंद झाली आहे.  पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं त्यांच्या सोशल मीडियावर पाकिस्तानी खेळाडूंचे काही फोटो पोस्ट केले आणि त्यावर सर्फराज अहमदच्या पत्नीनं प्रश्न विचारला, तिला त्याचे उत्तरही मिळाले.

पाकिस्तानी संघ इंग्लंड दौऱ्यानंतर आता वेस्ट इंडिजला पोहोचला आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेपूर्वी पाकिस्तानी खेळाडूंची भटकंती सुरू आहे. अशात बीच रिसॉर्टवर पाकिस्तानी खेळाडूंच्या भटकंतीचे काही फोटो पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं पोस्ट केले. त्यावर सर्फराजची पत्नी खुशबख्त (Khushbakht Sarfaraz) हिचा प्रश्न आला. 

खुशबख्तनं लिहिलं की, "Where's my Miyan?" ( माझा पती कुठेय?)... तिच्या या प्रश्नावर पाकिस्तान क्रिकेट बोर्डानंही उत्तर दिले.. त्यांनी सर्फराजचा फोटोच पोस्ट केला.   पाकिस्तान आणि वेस्ट इंडिज यांच्यात पाच ट्वेंटी-20 सामन्यांची मालिका 28 जुलैपासून सुरू होणार आहे. त्यानंतर उभय संघांमध्ये जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेअंतर्गत दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळवण्यात येईल.  

टॅग्स :पाकिस्तानवेस्ट इंडिज
Open in App