PAK vs SL Sahibzada Farhan Breaks Virat Kohli Record : टी-२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेतील सुपर ८ फेरतील अखेरच्या लढतीत पाकिस्तानचा सलामीवीर साहिबजादा फरहान याने मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे. कँडीतील पल्लेकेलेच्या मैदानात श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना त्याने फखर झमानच्या साथीनं पाकिस्तानच्या डावाची सुरुवात केली. या सामन्यात ३७ धावांचा टप्पा पार करताच साहिबजा फरहान याने एका हंगामात सर्वाधिक धावा करण्याचा विराट कोहलीचा विक्रम मोडीत काढला.
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!
विराट कोहलीने १२ वर्षांपूर्वी सेट केला होता रेकॉर्ड
भारताची रनमशिन विराट कोहलीनं २०१४ च्या हंगामात ३१९ धावा केल्या होत्या. १२ वर्षांपूर्वीचा त्याचा हा विक्रम साहिबजादा फरहान याने मागे टाकला आहे. साहिबजादा हा एका हंगामात ३०० पेक्षा अधिक धावा करणारा पाकिस्तानचा दुसरा फलंदाज आहे. बाबर आझमनं २०२१ च्या हंगामात ३०३ धावा केल्या होत्या. या दोघांना मागे टाकत साहिबजादा फरहान टी२० वर्ल्ड कप स्पर्धेतील एका हंगामात ३०० पेक्षा अधिक धावा करणाऱ्या आघाडीच्या पाच फलंदाजांच्या यादीत अव्वलस्थानी पोहचला आहे.
पाकिस्तानला हरवलं तर तोटा अन् हरलं तर कोट्यवधीचा फायदा, श्रीलंकेसमोर अजब पेच, करणार काय?
टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील एका हंगामात सर्वाधिक धावा करणारे ५ फलंदाज
- ३२३* - साहिबजादा फरहान २०२६*
- ३१९ - विराट कोहली २०१४
- ३१७ - तिलकरत्ने दिलशान २००९
- ३०३ - बाबर आझम २०२१
- ३०२ - महिला जयवर्धने २०१०
श्रीलंकेविरुद्धचा सामना मोठ्या फरकाने जिंकण्याचे चॅलेंज
यंदाच्या टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत टिकून राहण्यासाठी पाकिस्तानच्या संघाला श्रीलंकेविरुद्धचा सामना मोठ्या फरकाने जिंकावा लागणार आहे. सुपर ८ फेरीतील दुसऱ्या गटात इंग्लंडच्या संघाने विजयी हॅटट्रिकसह सेमीच तिकीट पक्के केले आहे. न्यूझीलंडचा संघ श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यातील एक विजय आणि पाकिस्तान विरुद्धचा सामना पावसामुळे रद्द झाल्यामुळे मिळालेल्या एका गुणासह एकूण ३ गुण मिळवून उत्तम धावगतीसह गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे. पाकिस्तानच्या संघाने हा सामना ६५ ते ६६ धावांनी जिंकला तर ते न्यूझीलंडला खाली खेचून सेमीफायलमध्ये प्रवेश करु शकतात.
Web Summary : Pakistan's Sahibzada Farhan surpassed Virat Kohli's record for most runs in a T20 World Cup season during the match against Sri Lanka. He's now among the top five batsmen with over 300 runs in a single season. Pakistan needs a big win against Sri Lanka to stay in the competition.
Web Summary : पाकिस्तान के साहिबजादा फरहान ने श्रीलंका के खिलाफ मैच में टी20 विश्व कप के एक सत्र में सबसे अधिक रन बनाने के मामले में विराट कोहली का रिकॉर्ड तोड़ दिया। वह एक सत्र में 300 से अधिक रन बनाने वाले शीर्ष पांच बल्लेबाजों में शामिल हैं। पाकिस्तान को प्रतियोगिता में बने रहने के लिए श्रीलंका के खिलाफ बड़ी जीत की जरूरत है।