Join us

PAK vs SL : १२२ धावांची खेळी करणाऱ्या कुसल मेंडिसला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले, कारण समजले 

श्रीलंकेचा यष्टिरक्षक-फलंदाज कुसल मेंडिस ( Kusal Mendis) याला रुग्णालयात नेण्यात आले.

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2023 19:52 IST

Open in App

PAK vs SL ICC ODI World Cup 2023 : हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर बाबर आजमच्या नेतृत्वाखालील पाकिस्तानविरुद्ध १२२ धावांच्या खेळीनंतर श्रीलंकेचा यष्टिरक्षक-फलंदाज कुसल मेंडिस ( Kusal Mendis) याला रुग्णालयात नेण्यात आले. मेंडिसला त्याच्या १२२ धावांच्या विक्रमी खेळीदरम्यान दुखापत झाली होती. श्रीलंका क्रिकेट (SLC) ने पहिल्या डावानंतर त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर माहिती शेअऱ केली. मेंडिसच्या अनुपस्थितीत, सदीरा समरविक्रमाने यष्टिरक्षणाची जबाबदारी घेतली आहे. १२२ धावांच्या खेळीनंतर पेव्हेलियनमध्ये परतत असताना कुसलला ही दुखापत झाली. 

श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करताना ९ बाद ३४४ धावा केल्या. कुसल मेंडिस आणि पथूम निसांका ( ५१) यांनी दुसऱ्या विकेटसाठी विक्रमी १०२ धावांची भागीदारी केली.  तिसऱ्या विकेटसाठी मेंडिस आणि सदीरा समराविक्रमा यांनीही ६९ चेंडूंत १११ धावांची भागीदारी केली. मेंडिस ७७ चेंडूंत १४ चौकार व ६ षटकारांसह १२२ धावांवर बाद झाला. त्याने श्रीलंकेकडून वन डे वर्ल्ड कप स्पर्धेतील वेगवान शतक झळकावले. समराविक्रमाने ८९ चेंडूंत ११ चौकार व २ षटकारांसह १०८ धावा केल्या.

श्रीलंकेने ९ बाद ३४४ धावा उभ्या केल्या. वर्ल्ड कप स्पर्धेत पाकिस्तानविरुद्ध कोणत्याही संघाची ही सर्वोत्तम धावसंख्या ठरली.  प्रत्युत्तरात पाकिस्तानचे इमाम-उल हक आणि बाबर आजम दोघंही ३७ धावांवर माघारी परतले आणि दिलशान मदुशंकाने या विकेट्स घेतल्या.  

टॅग्स :वन डे वर्ल्ड कपपाकिस्तानश्रीलंका