Join us
Daily Top 2Weekly Top 5

New Zealand Qualify For Semi : मॅच संपण्याआधीच पाकिस्तान OUT; न्यूझीलंड सेमीसाठी पात्र

पाकिस्तानच्या संघाने श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात पहिल्या विकेटसाठी १७६ धावांची विश्वविक्रमी भागीदारी रचली होती. पण

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2026 22:34 IST

Open in App

 Pakistan Out New Zealand Qualify For The Semifinal T20 World Cup 2026 : टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील श्रीलंका विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील सामना संपण्याआधीच यंदाच्या हंगामातील तिसरा सेमीफायनलिस्ट मिळाला. श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात पाकिस्तानच्या संघाने निर्धारित २० षटकात ८ बाद २१२ धावा करत २१३ धावांचे टार्गेट सेट केले होते. पण सेमीसाठी पात्र ठरण्यासाठी श्रीलंकेला १४७ धावांपर्यंत रोखाण्याचे आव्हान पाकिस्तानच्या गोलंदाजांसमोर होते.  पण पाक गोलंदाजांना ते जमलं नाही. श्रीलंकेच्या संघाने १४८ धावा करताच न्यूझीलंडचा संघ सेमीफायलसाठी पात्र ठरला. 

'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा! 

सलामीवीरांच्या दमदार शोनंतर पाकिस्तानची फलंदाजी कोलमडली, अन् नेट रनरेटच गणित चुकलं

पाकिस्तानच्या संघाने श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात पहिल्या विकेटसाठी १७६ धावांची विश्वविक्रमी भागीदारी रचली होती. पण त्यानंतर पुढच्या २५ चेंडूत पाकिस्तानच्या संघाने ३६ धावांत ८ विकेट्स गमावल्या. अखेरच्या दोन षकटकात तर पाकिस्तानने १२ चेंडूत फक्त १४ धावांत ६ विकेट्स गमावल्या. इथंच पाकिस्तानचं नेट रनरेटच गणित चुकलं. फलंदाजीतील या चुकीची किंमत पाकिस्तानला स्पर्धेबाहेर होऊन मोजावी लागली. श्रीलंकेपाठोपाठ सुपर ८ मधील दुसऱ्या गटातून बाहेर पडणारा पाकिस्तान दुसरा संघ ठरला. दुसरीकडे न्यूझीलंडच्या संघाने सर्वोच्च धावगतीसह ३ गुणांसह या गटातून  सेमीफायचं तिकीट बूक करणारी दुसरी टीम ठरली. याआधी इंग्लंडच्या संघाने या गटातून सेमी फायनल गाठली आहे. 

T20 World Cup New Record : पाकच्या साहिबजादानं साधला मोठा डाव; किंग कोहलीचा ऑलटाइम रेकॉर्ड मोडला

सेमीत ट्विस्ट, पाकिस्तानने शेवटी संधी गमावली

सुपर ८ मधील दुसऱ्या गटातील पहिल्या सामन्यात न्यूझीलंड आणि पाकिस्तान यांच्यातील लढत पावसामुळे रद्द झाली. परिणामी दोन्ही संघांना प्रत्येकी १-१ गुण मिळाला. दोन्ही संघांना इंग्लंडविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर सेमीच्या शर्यतीत ट्विस्ट निर्माण झाले. श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात पाकिस्तानला मोठ्या फरकाने विजय मिळवून सेमीच तिकीट मिळवण्याची शेवटची संधी होती. धावफलकावर २१२ धावा लावत श्रीलंकेसमोर त्यांनी चॅलेंज निर्माण करत आस कायम ठेवल्याचे चित्रही निर्माण झाले. पण शेवटी श्रीलंकेनं कडवी टक्कर दिली आणि  खराब 'नेट रनरेट'मुळे पाकिस्तानचा स्पर्धेतील खेळ खल्लास झाला.

 

English
हिंदी सारांश
Web Title : New Zealand Qualifies for Semi-Finals; Pakistan Out Before Match Ends

Web Summary : New Zealand secured a semi-final spot in the T20 World Cup as Pakistan failed to restrict Sri Lanka to under 147 runs. Despite a record-breaking opening partnership, Pakistan's late-innings collapse proved costly, leading to their elimination from the tournament.
टॅग्स :ट्वेंटी-20 वर्ल्ड कप २०२६श्रीलंकापाकिस्तानन्यूझीलंड